घुग्घूस गावातील आठवडी बाजार गुजरी बाजार येथे पार्किंगची व्यवस्था करावी…
मुख्याधिकारी,नगरपरिषद घुघुस येथे निवेदन देऊन मांगणी
घुग्घुस , येथे पन्नास हजार लोकसंख्येच्या वस्तीत सप्ताहातून एक दिवस रविवारला फार मोठ्या प्रमाणावर आठवडी बाजार भरण्यात येतो तरी या बाजारात घुग्घूसच्या आजू बाजूलगत १५ -२० गावातील लोक आठवडी बाजारात बाजार घेण्याकरिता येतात तसेच गावातील लोकसंख्या विचारात घेऊन आठवडी बाजारात फार मोठ्या प्रमाणावर वाहन पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे अनेक मोठया प्रमाणात वाहन पार्किंग समस्या निर्माण होत आहे, तसेच घुग्घूस नकोडा महत्त्वाचा रस्ता असल्यामुळे या ठिकाणाहून वाहतूक करण्यात अडचण निर्माण होतात व तसेच नगरपरिषद समोरील गुजरी बाजार या ठिकाणी सुद्धा गावातील भरपूर प्रमाणात लोक रोज बाजार घेण्याकरता येतात त्या ठिकाणी सुद्धा पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे वाहतुकीस अडचण निर्माण होत आहे तरी या विषयाची गांभीर्य लक्षात घेऊन योग्य ती व्यवस्था करण्यात यावी अशी मनसे चंद्रपुर तालुका उपाध्यक्ष पंकज राजपुत,सुमित कोहळे,घुग्घुस शहर अध्यक्ष, निखिल बोबडे घुग्घुस शहर उपाध्यक्ष,निशांत ठाकरे घुग्घुस शहर उपाध्यक्ष अदीनी नगर परिषद मुख्याधिकारी निलेश रांजनकर यांना निवेदन देऊन मांगणी केली.










