आयटक संलग्न एम.एस.ई.बी.वर्कर्स फेडरेशनचे नेते कॉम्रेड नामदेव कन्नाके व कॉम्रेड कृष्णा भोयर यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम सोहळा वणी येथे प्रचंड शेकडो कामगाराच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न
३१ विज कामगाराचा वर्कर्स फेडरेशन मध्ये प्रवेश
*************************
महावितरण कंपनीची पुनर्रचना म्हणजे कामगार कपात:-कॉम्रेड मोहन शर्मा
*************************
*खाजगी भांडवलदाराच्या पुढे पायघड्या घालणार महावितरण कंपनीच प्रशासन:- कॉम्रेड कृष्णा भोयर
*वणी*– महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन आयटक संलग्न संघटना अमरावती झोन व यवतमाळ सर्कलच्या वतीने नुकतेच बाजोरिया लाॅन वणी येथे आयटक नेते कॉम्रेड कृष्णा भोयर व कॉम्रेड नामदेव कन्नाके यांचा कार्यगौरव सोहळा कॉम्रेड मोहन शर्माजी अध्यक्ष वर्कर्स फेडरेशन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला होता.या कार्यक्रमाला सत्कारमूर्ती म्हणून कॉम्रेड कृष्णा भोयर सरचिटणीस व कॉम्रेड नामदेव कन्नाके अमरावती झोन अध्यक्ष व सौ.कन्नाके उपस्थित होत्या.प्रमुख पाहुणे कॉम्रेड एन.वाय.देशमुख (सरचिटणीस) वीज उद्योगातील कंत्राटी व बाहयस्तोत्र कामगार संघटना, कॉम्रेड विजय ठाकरे,कॉम्रेड राजेश तिवारी, कॉम्रेड राजेश सलामे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य,कॉम्रेड महेश जाधव झोनल सचिव अमरावती,कॉम्रेड सुनील राऊत उपझोनल अमरावती पारेषण, कॉम्रेड चंद्रकांत धार्मिक उपाध्यक्ष,कॉम्रेड उमेश भोयर झोनल संघटक,अतुल नेरकर झोनल संघटक, कॉम्रेड नितीन रहाटे झोनल खजिनदार,कॉम्रेड धनंजय पेटेवार सर्कल अध्यक्ष यवतमाळ,कॉम्रेड प्रशांत शिंदे सर्कल सचिव यवतमाळ, कॉम्रेड विजय वावरकर सर्कल प्रमुख अमरावती सर्कल व्यासपीठावर उपस्थित होते. व्यासपीठावरील मान्यवर यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन यवतमाळ सर्कलच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.दिवंगताना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉम्रेड सचिन अशोक नागपूरे विभागीय सचिव पांढरकवडा यांनी केले.
कॉम्रेड ए.बी.बर्धन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलित करत कार्यक्रमाचे उद्घाटन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कॉम्रेड कृष्णा भोयर व कॉम्रेड नामदेव कन्नाके व सौ.लता कन्नाके यांचा शाल,श्रीफळ,स्मृतिचिन्ह व पुष्पहार घालून कार्यगौरव यवतमाळ सर्कलच्या वतीने प्रचंड घोषणाच्या गजरात करण्यात आला. कार्यगौरव सोहळ्यास व कामगार मेळाव्यास कॉम्रेड विजय वावरकर,कॉम्रेड धनंजय पेठेवार,कॉम्रेड प्रशांत शिंदे,कॉम्रेड महेश जाधव,कॉम्रेड विजय ठाकरे व कॉम्रेड एन.वाय.देशमुख यांनी शुभेच्छा देत विषयावर मार्गदर्शन केले.
पारेषण व वितरण कंपनीत नवीन लागलेले विद्युत सहायक व विविध संघटना मधून ३१ खालील वीज कामगारांनी संघटनेत प्रवेश केला. त्यांची नावे खालील प्रमाणे वितरण कंपनी :- मधील राहुल नागपुरे (यंत्रचालक),मंगेश मरसकोल्हे (विद्युत सहाय्यक),किरण झरकर (मुख्य तंत्रज्ञ),सचिन बावणे (यंत्रचालक),तारासिंग जाधव (विद्युत सहाय्यक), नरेंद्र टारपे (विद्युत सहाय्यक),सुमित सोनेकर (विद्युत सहाय्यक), शंकर खामनकर (विद्युत सहाय्यक),निखिल बोबडे (विद्युत सहाय्यक),कैलास झोले (यंत्रचालक), राजेंद्र घनमोडे (यंत्रचालक),विकास काळे (वरिष्ठ-तंत्रज्ञ),पांडुरंग परबत (प्रधान यंत्रचालक), पारेषण कंपनी :-मधील मनोज भेंडे,मोहित डवरे,रोहित अमृते,चेतन पुरी,अंकुश चांदरकर, प्रतीक रननवरे,अजिंक्य पवार,तुषार आलोने, श्याम पोहकार,स्वराज सावरकर,कृष्णा राठोड, धनमोडे मॅडम,प्रशांत बावणे,राहुल जोगदंड, ऋतिका वरभे,साक्षी हुड,पारवती पारधी व अजित वानकाडे यांना प्रवेश देण्यात आला.पारेषण मधील विद्युत सहायकानी संघटनेच्या नेतृत्वास कॉम्रेड सुनील राऊत यांच्या नेतृत्वात निवेदन देऊन ३ वर्षाचा कालावधी कमी करणे तसेच विद्युत सहायकांना इतर कर्मचाऱ्याप्रमाणे अतिकालीन ज्यादा केलेल्या कामाचा मोबदला मिळणे या मागण्यांचे निवेदन दिले.संघटनेच्या नेतृत्वाने त्यांच्या मागण्या मुख्य कार्यालयात मांडून पूर्ण करण्यास प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
*कॉम्रेड कृष्णा भोयर* कामगार मेळाव्यास संबोधित करताना म्हणाले की,वणी येथे आयोजित कामगार मेळाव्यात मी महावितरण कंपनीच्या सेवेतून सेवानिवृत्त झाल्याबद्दल यवतमाळ मंडळातील पदाधिकारी यांनी माझा व कॉम्रेड नामदेव कन्नाके यांचा जो सत्कार केला त्यांना बदल मी मनापासून धन्यवाद देतो.कॉम्रेड नामदेव कन्नाके हे माझे अप्रेंटिस चळवळी पासूनचे सहकारी असून त्यांनी प्रामाणिकपणे ३५ वर्ष संघटनेची सेवा केली.त्याबद्दल हा कार्यगौरव सोहळा संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आला.असे कार्यक्रम ज्यां पदाधिकाऱ्यांचे होतात जे प्रामाणिकपणे व निष्ठेने संघटनेच काम करतात.
संघटनेच्या इतिहास फार मोठा आहे.कॉम्रेड ए.बी.बर्धन व कॉम्रेड दत्ता देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली संघटना आज वटवृक्षामध्ये रूपांतरित झाली आहे.गेल्या ६४ वर्षात ९ पगारवाढीचे करार करताना सर्व प्रवर्गातील कामगारांना न्याय देण्याचे काम संघटनेने केलेले आहे.
देशातील व राज्यातील वीज उद्योगातील स्थिती अतिशय खराब होत आहे.आपली संघटना महाराष्ट्रात नव्हे तर देशपातळीवर कार्यरत असून सातत्याने खाजगीकरणाला विरोध करत आहे.केंद्र सरकारचे धोरण देशातील सार्वजनिक वीज कंपन्याचे खाजगीरण करण्याचे आहे.सन २०१४ पासून आपल्या संघटनेने सुधारित विद्युत कायद्याला विरोध केल्यामुळेच ४४ सार्वजनिक वीज वितरण कंपन्यांचे अस्तित्व टिकवून आहे.केंद्र सरकारने केंद्रशासित प्रदेशातील सर्व वितरण कंपन्यांचे खाजगीकरण केलेले आहे.चंदीगड वितरण कंपनी २ फरवरीला गोयनका कंपनीने ताब्यात घेतली आहे.मध्यप्रदेश मधील ट्रान्समिशन कंपनी अदानीने ताब्यात घेतली आहे.ओडिसा मधील संपूर्ण वितरण कंपनी टाटाच्या ताब्यामध्ये आहे.मुंबई,दिल्ली व कलकत्ता या मोठ्या शहरांमध्ये खाजगी भांडवलदार वीज वितरण करत आहे.
महावितरण कंपनीच्या नफ्याच्या क्षेत्रामध्ये टाटा,टोरेंटो,अदानी व इतर खाजगी भांडवलदारांनी समांतर वीज वितरणाचा परवाना राज्य वीज नियामक आयोगाकडे मागितलेला आहे.ही सार्वजनिक वीज वितरण कंपन्याकरीता धोक्याची घंटा आहे.ट्रान्समिशन कंपनी मध्ये २०० कोटीच्या वरील टर्नकी कॉन्टॅक्ट खाजगी भांडवलदारांना देण्याकरिता चार कंपन्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.महापारेषण कंपनीस शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग करण्यात येणार आहे.२७००० कोटीचा स्मार्ट प्रीपेड मीटरचा प्रोजेक्ट महावितरण कंपनी राबवत आहे.या प्रकल्पामुळे महावितरण कंपनीची आर्थिक शिस्त पूर्ण ढासळणार आहे. ज्या कंपन्यांना स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याचे टेंडर दिलेले आहे त्या कंपन्या मीटर लावण्याचा अपयशी ठरलेले आहे. ते काम कर्मचाऱ्याकडून प्रशासन दबाव टाकून करून घेत आहे. याचाच अर्थ प्रशासन खाजगी भांडवलदारांच्या पुढे पायघड्या घालत आहे.
१ लाख कोटीच्या वर महावितरण कंपनीची वीज ग्राहकाकडे असलेले थकबाकी हा मोठा चिंतेचा विषय आहे.विकलेल्या प्रत्येक युनिट विजेचे पैसे वसूल झाले नाही,तर महावितरण कंपनी भविष्यात आर्थिक अडचणीत जाणार आहे. सध्या महावितरण कंपनीत १ आक्टोंबर पासून पुनर्रचना करण्यात येणार आहे.पुनर्रचना म्हणजेच कामगार कपात. पुनर्रचनेबाबत संघटनेने विस्तृत निवेदन व्यवस्थापन आज दिलेले आहे. कर्मचाऱ्यांनी वीज कंपन्या टिकवण्याबरोबरच त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्या करीता प्रामाणिकपणे प्रयत्न करावे असे आव्हान त्यांनी केले.
कॉम्रेड मोहन शर्माजी कार्यक्रमास संबोधित करताना म्हणाले की,सन १९६७ मध्ये जो संप झाला त्या संपाचा नेतृत्व यवतमाळ जिल्ह्याने केलं.मी ४३ दिवस त्या संपामध्ये होतो.त्या संपाचे साक्षीदार श्री.पेटेवार पुढे बसलेले आहे.आम्हा दोघांना पोलिसांनी रेस्ट हाऊस मध्ये नजरबंद केले होते. पोलिसांना चकमा देऊन आम्ही त्या ठिकाणाहून सुटलो.त्या लढाई यवतमाळ जिल्ह्यातील अनेक कामगार माझ्यासोबत होते. आज महाराष्ट्रात मयत झालेल्या कामगाराचे ४००० च्या वर जे कर्मचारी कामावर लागले ते वर्कर्स फेडरेशनच्या संघर्षामुळे. सन १९९० मध्ये श्री.नामदेव कन्नाके हे यंत्रचालक म्हणून विद्युत मंडळात लागले तेव्हा त्यांचा पगार रु.१०१० होता.सेवानिवृत्त होताना त्यांचा पगार रु.१ लाख ६० हजार होता ही संघटनेची देण आहे.
सध्या महाराष्ट्राचा वीज उद्योग गंभीर संकटात आहे.याची जाणीव सर्वांनी ठेवावी.केंद्र व महाराष्ट्र सरकार सरकारी वीज कंपन्या खाजगी भांडवलदारांना देण्याच्या घाट घालत आहे. महाराष्ट्रातील महावितरण कंपनीचे मुंब्रा,मालेगाव, भिवंडी व कळवा या भागात टोरंटो,अदानी व कलकत्ता इलेक्ट्रिकल खाजगी कंपन्यांना चालवण्यास दिलेले आहे.देशातील सर्व ऊर्जामंत्री २०१४ मध्ये कोची येथे परिषद घेऊन देशातील सार्वजनिक वीज कंपन्या खाजगीकरण करण्याच्या उद्देशाने २०१४ मध्ये नवीन विधेयक लोकसभेमध्ये पास करण्याचा प्रयत्न केला.त्याला सातत्याने आपण विरोध केला २०२५ पर्यंत ते विधेयक संसदेमध्ये पास होऊ शकले नाही हा फार मोठा विजय आपण सतत संप व संघर्ष केल्यामुळे मिळलेला आहे.
दिनांक ९ जुलैचा संप हा सध्या केंद्र सरकारने कामगार कायदे बदललेले व वीज उद्योगाचे खाजगीकरण करण्याचे जे धोरण आखलेले आहे त्याच्या विरोधात होता.या संपामध्ये तिन्ही वीज कंपन्यातील कामगारांनी जबरदस्त भागीदारी करून ६ संघटनांच्या नेतृत्वावर एकजूट दाखवली.संप केल्याशिवाय तुम्हाला सरकारचे धोरणे बदलता येणार नाही.सरकारच्या धोरणाच्या विरोधात कामगारांनी लढले पाहिजे. महाराष्ट्र सरकारने सरकारच्या धोरणाच्या विरोधात बोलू नये म्हणून जनसुरक्षा नावाचे जे विधेयक आणले आहे. ते विधेयक जनविरोधी आहे त्याचा विरोध करा.हे विधेयक म्हणजे इंग्रजांनी जे विधेयक आणले होते व त्या विधेयकाच्या विरोधात भगतसिंगाने संसदेत बाम टाकला होता. तशाच पद्धतीचे जनसुरक्षा विधेयक आहे असे मोहन शर्माजी संबोधित करताना म्हणाले.
महावितरण कंपनीने सध्या स्मार्ट प्रीपेड मीटर वीज ग्राहकांना लावण्याचे सुरू केले आहे.या मीटरची आवश्यकता नाही.हे मीटर लागल्यानंतर महाराष्ट्रात मोठ्या बिल्डींग,कॅश काऊंटर,फोटो मीटर रीडर,बिल वाटप करणारे व कार्यालयीन कर्मचारी यांची कपात होऊन प्रमाणावर बेरोजगारीच वाढ होईल. या विरोधात फक्त एकमेव संघटना फेडरेशन लढा देत आहे.आपल्या संघटनेचे महत्त्व वीज उद्योगात कार्यरत कर्मचाऱ्यांना सांगून त्यांना आपल्या संघटनेचा आणावे. यवतमाळ सर्कल मध्ये संघटनेचे काम चांगले आहे ते अधिक चांगलं करण्याकरीता व पगारवाढ निधी गोळ्या करण्याकरीता सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावे.सप्टेंबर मध्ये पगारवाढीचा शेवटचा हप्ता मिळणार आहे तेव्हा पैसे गोळा करून संघटनेला द्यावे.
महावितरण कंपनीत सध्या पुनर्रचना करण्याची प्रक्रिया सुरू आहे.पुनर्रचना म्हणजेच कामगार कपात हे महापारेषण कंपनीत यापूर्वी आपण अनुभवलेल आहे.पुनर्रचनेमुळे जागा कमी होणार,कर्मचाऱ्या वरती कामाचा ताण अधिक वाढेल काही. संघटनांच्या मागणीमुळे व्यवस्थापनाने पुनर्रचनेचा प्रस्ताव संघटना पुढे ठेवला.भविष्याचा विचार न करता काही संघटनांनी ह्या प्रस्तावाला समर्थन दिले ही आपल्या सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे. महाराष्ट्र सरकारने कामगार कायदे बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे तर कामगार चळवळ संपूर्ण उद्ध्वस्त होणार आहे. कंत्राटी कामगार व इतर कामगारांनी कल्याण निधीचे सभासद व्हावे.त्याचे खूप फायदे कर्मचाऱ्यांसाठी आहे मेळावा अतिशय चांगल्या केल्याबद्दल धन्यवाद दिले.
मेळावा यशस्वी करण्याकरीता यवतमाळ सर्कलमध्ये सर्वच पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.कार्यगौरव सोहळा व सत्कार समारंभा मध्ये ४०० च्या वर कामगारांनी भागीदारी केली. मेळावा यशस्वी करण्यामध्ये ज्यांनी परिश्रम घेतले त्यांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला.










