वणी पब्लीक स्कुल येथे शिक्षक दिन संपन्न

60

वणी पब्लीक स्कुल येथे शिक्षक दिन संपन्न



वणी*– येथील वणी पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा.
शाळेचे प्राचार्य श्री राकेश कुमार देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कुमारी आफरीन अन्सारी आणि कु. सना शेख हिने केले. दहावीच्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना अमूल्य भेट तसेच प्रेमाचे प्रतीक एक गुलाब पुष्प देऊन आपली कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी विविध कलेचे सादरीकरण करीत नृत्य, गीते, तसेच भाषणे सादर केली. शिक्षकांसाठी विविध खेळ आयोजित केले. शिक्षक दिनानिमित्त जे विद्यार्थी शिक्षक बनले होते, त्यांना प्रोत्साहन देत उत्कृष्ट भूमिका पार पाडणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यात आली. शिक्षकांनी आपले मत व्यक्त करीत मुलांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्राचार्य श्री राकेश कुमार देशपांडे यांनी अध्यक्षीय भाषणातून मुलांना मार्गदर्शन केले. संस्थेचे संचालक श्री ओमप्रकाशजी चचडा आणि सदस्य श्री विक्रांतजी चचडा यांनी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. काव्य पारखी द्वारे आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here