राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात संपन्न
वणी : राजर्षी शाहू महाराज हिंदी विद्यालय, वणी येथे ‘हिंदी दिवस’ उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरूवात विद्यार्थि द्वारा निर्मित शिल्पकला व रांगोळी कलाकृतीच्या परिक्षणाने झाला.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन मा. श्री.अतुल राजगडकर प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण केंद्र,वणी उपस्थित होते, विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. पारखी सर अध्यक्ष म्हणुन उपस्थित होते. याप्रसंगी विवीध सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.विवीध स्पर्धा घेण्यात आले.हा कार्यक्रम संपुर्ण सात दिवस राबविण्यात आला. समारोहाचे सूत्रसंचालन सौ.अनिता टोंगे यांनी, प्रास्ताविक श्री.गंगारेड्डी बोडखे यांनी तर आभारप्रदशर्रन श्री. प्रभुदास नगराळे यांनी केले. समारोहाचे यशस्वितेसाठी भाग्यश्री लांडे मॅडम, प्रतिश लखमापुरे सर, तुषार घाणे सर, सुनिल गेडाम, राजेंद्र देवतळे, हरिदास बोढाले, हरीष वासेकर, जितेंद्र डगावकर यांनी अथक प्रयत्न केले.










