धानोरा ग्रामपंचायती समोर आमरण उपोषण सुरु
वारंवार पत्र निवेदन देऊन सुद्धा ग्रामपंचायत तसेच प्रशासणाचे दुर्लक्ष
चंद्रपूर:- तालुक्यातील धानोरा येथील दोन महिला सौ. मंगला भास्कर गौरकार आणि सौ. मायाबाई ठावरी यांनी ग्रामपंचायतच्या विरोधात 26 सप्टेंबर 2025 पासून ग्रामपंचायत कार्यलया समोर आमरण उपोषण सुरु केले आहे.
दिनांक. १२/०८/२०२५ ला ग्रामपंचायत कार्यलय धानोरा इथे निवेदन दिले जवळ पास एक महिना होऊन सुद्धा ग्रामपंचायत मार्फत कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही त्या नंतर सुद्धा दिनांक १०/९/२०२५ ला ग्रामपंचायत कार्यालय धानोरा मा.श्री.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर,गट विकास अधिकारी पंचायत समिती चंद्रपूर,मा.पोलीस निरीक्षक साहेब घुघूस, मा. आमदार साहेब चंद्रपूर विधानसभा क्षेत्र,मा. उपविभागीय अधिकारी साहेब चंद्रपूर, मा. तहसीलदार साहेब चंद्रपूर मा.जिल्हा अधिकारी साहेब चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले तरी सुद्धा कोणतीही कार्यवाही केली नाही. गेल्या अनेक वर्ष्या पासून आम्ही राहीवासी असून आमच्या घरा कडे ये-जा करण्यासाठी साठी कुठलाही योग्य मार्ग नसून नागरिकांना घरा पासून काही अंतरवार बैलबंडी मोटर सायकल ठेऊन पायदळ ये-जा करतात. या संदर्भात गट विकास अधिकारी साहेब यांना २९/१/२०१९ ला निवेदन दिल होत तरी त्याच्या कढून ग्रामपंचायत ला दिनांक ३०/१/२०१९ ला पत्र आले तरी सुद्धा ग्रामपंचायतनी यांच्या कढे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आणि एवढे निवेदन देऊन वारंवार पाठपुरवठा करून सुद्धा कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे आमरण उपोषणाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपोषण करत्यानी दिली.
प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे
१) आम्हाला ये-जा करण्यासाठी रस्ता काढून देण्याबाबत.
२) सदर रस्ता बांधून देण्या बाबत.
त्यामुळे आता मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण सुरु राहील असे सौ. मंगला भास्कर गौरकार आणि सौ. मायाबाई ठावरी स्पष्ट केले.










