नवरात्रीच्या औचित्य साधून उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे विविध विषयांवर मार्गदर्शन सत्र
वरोरा : वंदना विनोद बरडे सहायक अधीसेवीका
सगळीकडे नवरात्रीच्या माध्यमातून शक्ती वातावरण आहे.स्रिशक्तीचा जागर सुरू आहे.त्याचे औचित्य साधून सोमवार पासून वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन दिले जात आहे.त्यापैकी मंगळवार, गुरुवार, शूक्रवार हे माता बालसंगोपन दिवस आहे ज्यामध्ये गरोदर मातांना गरोदर राहल्यापासून तर बाळ अडिच वर्षांचं होईपर्यंत मार्गदर्शन केले जाते यामध्ये केअर काॅम्पियन प्रोग्राम अंतर्गत ब्रेस्ट माॅडैल,बेबी माॅडेल,फ्लीप चार्ट, ईत्यादी साधनांचा वापर करून माहीती दिली जाते.तसेच शुक्रवारी लसिकरण याविषयी मार्गदर्शन केले जाते.आज दिनांक २६ सप्टेंबर २०२५ ला काही विशेष दिनांचि माहीती देण्यात आली.वंदना बरडे अधीसेवीका यांनी जागतिक गर्भनिरोधक दिन, जागतिक पर्यावरण आरोग्य दिन, जागतिक अन्न वस्त्र निर्मुलन दिन, गर्भसंस्कार,१००० दिवसाचे महत्त्व, स्वस्थ नारी सक्षक्त परिवार,समज गैरसमज, समजावून सांगितले व वरिल सर्व विषयांवर सविस्तर उदाहरणादाखल मार्गदर्शन केले.गितांजली ढोक आहार तज्ञ यांनी आहाराची माहिती दिली,स्वाती जुनारकर यांनी लसिकरणाची माहीती दिली,किरण वांढरे यांनी जनजीसुरक्षा, प्रधानमंत्री मात्रतुवंदना योजना विषयी माहिती दिली.रोहीनी आत्राम अप.यानी बाळाला दुध पाजण्याचे पध्दती,त्याची काळजी ईत्यादी माहिती प्रात्यक्षिका सहीत दिली.असा हा आरोग्याचा जनजागृती प्रचार व प्रसार जागर वंदना विनोद बरडे सहायक अधीसेवीका उपजिल्हा रुग्णालय वरोरा यांच्या मार्फत चालू आहे.










