पोलीस स्टेशन घुग्घुस हद्दीतील ATM कटींग टोळीचा पर्दाफाश.

34

पोलीस स्टेशन घुग्घुस हद्दीतील ATM कटींग टोळीचा पर्दाफाश.



राजस्थानचा आरोपी अटकेत. स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई


घुग्घुस : दिनांक १५/०९/२०२५ रोजी रात्रौ दरम्यान पोस्टे घुग्घुस अंतर्गत बैंक ऑफ महाराष्ट्र, पांढरकवडा, जि. चंद्रपुर येथील रोडवरील ATM काही अज्ञात इसम गॅस कटरचे राहयाने कटिंग करून ATM मधील १०,९२,८००/- रूपये चोरी केली अशा रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन, मुग्धुरा जि. चंद्रपुर येथे १८४/२०२५ कलम ३०५, ३३१ (४), ३३४ (१) भारतीय न्याय संहिता सन २०२३ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
नमुद गुन्हयाचे गांर्भीय पाहता, मा. पोलीस अधीक्षक सा, चंद्रपुर यांनी पोलीस निरीक्षक, अमोल काचोरे, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांना वेगवेगळे पथक तयार करून गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यावरून पो.नि. अमोल काचोरे, स्थागुशा, चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील वेगवेगळे पथक तयार करून आरोपीतांचा शोध घेण्यास सुरूवात केली. गुन्हयाचे घटनास्थळाची पाहणी केली असता, घटने दरम्यान एक पांढ-या रंगाची महिंद्रा बोलेरो विना क्रमांकाच्या वाहनात काही अज्ञात इसम येवून ऑक्सीजन गॅस कटरचे सहयाने बँक ऑफ महाराष्ट्र, पांढरकवडा, जि. चंद्रपुर येथील रोडवरील ATM मशिनची कटींग करून पैसे चोरी करून घेवुन गेल्याचे दिसुन आले. त्यावरूण सदर पांढ-या रंगाची महिंद्रा बोलेरे विना क्रमांकाचे वाहनाचे पाठलाग करण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथिल दोन वेगवेगळे पथक करून एक पथक देशाचे उत्तर दिशेला व दुसरे पथक दक्षिण दिशेला रवाना करून, सतत १३ दिवस, दिवस-रात्रौ अंदाजे ९००-१००० सी.सी.टि.व्हि. कॅमे-याची पाहणी करून तांत्रिक पध्दतीने कौशल्यापूर्ण तपास करून अथक परिश्रम घेवून आरोपी नामे जिल्ली सिरदार खान, वय-५२ वर्ष, रा. सबलगड ता. कामा, जि, भरतपुर, राज्य-राजस्थान यास चिन्नुर, जि. मंचेरियाल, राज्य तेलंगाना येथुन ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपीस पुढील तपास कामी पोलीस स्टेशन, घुग्घुरा, जि. चंद्रपुर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
हल्ल्यातील आरोपीचे नाव :- १) जिल्हा सिरदार खान, वाय-५२ वर्षे, रु. सबलगड ता. कामा, जिल्हा, भरतपूर, राज्य-राजस्थान
पाहीजे आरोपी : १) साजीद खान राजुददीन, रा. भाकडोजी, पोलीस स्टेशन फिरोजपुर झिरका, जिल्हा नुह, राज्य हरीयाना,
२) शैकुल उन्नास खान, रु. सावलेर, पोलीस स्टेशन पहाडी, ता. पहाडी, जिल्हा, खण, राज्य राजस्थान,
३) काला, रा. गुमटकी, बडकली चौकी, पोलीस स्टेशन नगीना, जिल्हा बुह, राज्य हरीयाणा
सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन साहेब चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सपोनि दिपक कांक्रेडवार, सपोनि बलराम झाडोकार, पोउपनि विनोद भुरले,, पोउपनि सुनिल गौरकार, पोहवा/सुभाष गोहोकार, पोहया/सतिश अवयरे, पोहवा/रजनिकांत पुठ्ठ्ठावार, पोहवा/दिपक डोंगरे, पोहया/इम्रान खान, पोअ/किशोर वाकाटे, पोशि/हिरालाल गुप्ता, पोअ/शशांक बादामवार, पोअ/मिलीद जांभुळे, चपोअ/रुषभ बारसिंगे सर्च स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर तसेच सायबर पोलीस ठाणे, चंद्रपुर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here