आयटक संलग्न जनरल ईंडस्ट्रीज कामगार युनियनची RCCPL कंपनी मुकुटबन येथे स्थापना

24

आयटक संलग्न जनरल ईंडस्ट्रीज कामगार युनियनची RCCPL कंपनी मुकुटबन येथे स्थापना


वणी जि.यवतमाळ*– मुकुटबन येथे कार्यरत RCCPL MP BIRLA या सिमेंट कंपनीमध्ये काम करणारे कामगारांना योग्य वेतन मिळाले पाहिजे व प्रलंबित समस्यांचे निराकरण होण्यासाठी कामगारांनी वणी विधानसभा क्षेत्राचे प्रखर व लढाऊ नेत्रुत्व कामगार नेते काॅ.अनिल हेपट यांचेकडे धाव घेत मुकुटबन येथे नुकतीच सभा घेतली.दत्तमंदीर येथे आयोजित सभेमध्ये आयटक संलग्न जनरल ईंडस्ट्रीज कामगार युनियनची स्थापना करण्यात आली.कार्यकारणीची निवड करण्यात आली त्यामध्ये अध्यक्ष म्हणुन काॅ.अनिल हेपट यांची निवड करण्यात आली.उपाध्यक्ष-पंढरी मोहीतकर,राजु वर्हाटे,सचिव-प्रफुल बंद्रे,सहसचिव- रोशन चामाटे,कोषाध्यक्ष- अक्षय पुल्लीवार,निमंत्रक- मोरेश्वर कुंटलवार,संघटक- दिनेश शिटलवार,सदस्य- निरज खैरकर,सुमित नगराळे,महादेव मेश्राम,अनिल मोंडे,प्रभुदास चाफले,कलीम खान पठाण,देवराव आत्राम,राकेश काकरवार,भुमन्ना आरमुरवार,राहुल येनगुर्तिवार,आकाश पारातळे,कवडु केळझरकर,सौरभ भांदेकर यांचा समावेश आहे.याप्रसंगी सभेला काॅ.अनिल हेपट,अनिल घाटे,मोरेश्वर कुंटलवार,रवी गोरे,दिनेश शिटलवार यांनी मार्गदर्शन केले.सभेचे संचालन दिनेश शिटलवार यांनी तर आभार प्रदर्शन अक्षय पुल्लीवार यांनी केले.सभेला शेकडो कामगार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here