स्थानिक गुन्हे शाखेची दारू वाहतुकीवर मोठी कारवाई
नितेश केराम
चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या कोरपना पोलीस स्टेशनं हदीत 2 आक्टॉबर रोजी रात्रीच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा (LCB) चे अधिकारी व कर्मचारी पेट्रोलिंगवर असतांना गुप्त माहिती मिळाली की एका टाटा सुमो अवैधरित्या विक्रीसाठी देशी दारूची वाहतुक होत आहे या माहिती वरून LCB च्या पथकाने कोरपना रोडवरील माथा फाटा येथे सापडा रचून नाकाबंदी केली दरम्यान एका टाटा सुमो वाहनाला थांबवून पंचासमक्ष पाहणी केली तेव्हा त्याममध्ये देशी दारूच्या प्रत्यक्ती 90 ML च्या 38 पेट्या मिळून आल्या
यावरून फ्रफुल पुरोशोतम खेलुरकर वय वर्ष 25 रा आंतरगाव ता कोरपना प्रशांत नारायण मेसराम वय वर्ष 25 रा वनसडी यांना ताब्यात घेतले अमर व्हेटी अरिफ शेख रा कुरई ता वणी जी यवतमाळ सद्या फरार आहे यांच्याविरुद्ध कोरपना पोलीस स्टेशनं येते संबंधीत कलमान्व्हये गुन्ह्याची नोद करण्यात आली असून दारू किंमत अंदाजे 1 लाख 52 हजार व टाटा सुमो वाहन करा MH/14/ CG/6143असा एकूण 6 लाख 82 हजाराचा मुद्धेमाल जप्त करण्यात आला आहे पुढील तपासकामी आरोपी आणि मुद्धे माल कोरपना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे
सदरची कारवाई जिल्हा पोलीस आधीक्षक मुमका सुदर्शन अपर पोलीस आधीक्षक ईश्वर कातकडे उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली LCB चे पोलीस निरीक्षक अमोल कचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि दीपक कांक्रेडवार सपोनि बलराम झाडोकर पोह स्वामीदास चालेकर पोह किशोर वैरागडे पोशी गोपीनाथ नरोटे शेखर माथनकर चापोशि बाराशिंगे तसेच राजुरा गडचांदूर उपविभाग स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली आहे










