अंमली पदार्थ मुक्त भारत मोहिमेअंतर्गत
पोलीस मुख्यालय चंद्रपूर येथे सर्मपण ध्यान योग शिबीर संपन्न
योग हे जगाला जोडण्याचे एकमेव साधन आहे… महर्षी श्री शिवकृपानंद स्वामीजी
चंद्रपुर : संदीप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र, नागपूर यांच्या संकल्पना व मार्गदर्शनाखाली दिनांक ०४/१०/२०२५ रोजी चंद्रपूर जिल्हा पोलीस दल आणि श्री शिवकृपानंद स्वामी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी, अंमलदार व कुटूंबियासह जिल्हयातील सर्व क्षेत्रातील नागरीकाकरीता पोलीस बहुउद्देशिय सभागृह चंद्रपूर येथे “नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत सर्मपण ध्यानयोग शिबीर” चे आयोजन करण्यात आले होते. –
या शिबीराचा मुख्य उद्देश म्हणजे समाजातील व्यसन आणि मादक पदार्थाच्या वापराला प्रतिबंध घालणे आणि “नशा मुक्त भारत” घडविण्याकडे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नागरीकांना सुध्दा प्रेरित करणे आणि ध्यान, योग व आत्मजागृतीच्या माध्यमातून युवक, विद्यार्थी व नागरिकांमध्ये सकारात्मक ऊर्जा आणि मानसिक सशक्तता वाढवणे हे या उपक्रमाचे प्राथमिक ध्येय आहे.
सदर शिबीराचे मुख्य मार्गदर्शक हिमालयीन ध्यान योगाचे संस्थापक आणि जगभरातील समग्र योगाचे प्रचारक, महर्षी श्री शिवकृपानंद स्वामीजी यांनी प्रवचन, ध्यान आणि प्रश्नोत्तर सत्राद्वारे उपस्थितांना सहजतेने मार्गदर्शन केले. शिबीरात पुज्य स्वामीजी म्हणाले, “भारतीय संस्कृती आपल्याला “वसुवैध कुटूंबकम” ची भावना शिकवते. महर्षी शिवकृपानंद स्वामीजी गेल्या ३० वर्षापासुन समाजात या हिमालयीन ध्यान योगाच्या प्रथेला प्रोत्साहन देण्यासाठी अथक परिश्रम करून ते हे ज्ञान मोफत देत आहेत. हिमालयीन ध्यान योग संस्कार, जो लोकांना त्यांच्या आत्म्यांना समजून घेण्यास आणि त्यांना परमात्मा कडे घेवून जाण्यास सक्षम करतो ही बाब आजच्या काळाची एक महत्वाची गरज आहे.
सदर शिबीर प्रसंगी संदीप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र, नागपूर यांनी सांगितले की, नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत हा ध्यान योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन योग आणि ध्यानाचे माध्यमातुन नशामुक्ती होवु शकतो यावर बरेच प्रयोग झाले असुन मेडीटिऐशनचा फार चांगला उपयोग नशामुक्ती साठी झाल्याचे प्रमाण आहे. आजच्या कार्यक्रमातुन तरुण तसेच नागरीकांमध्ये ध्यान संस्कार, ध्यान कसे करायचे, आणि हिमालयीन ध्यान योग संस्कार तरुण व नागरीकांना शिकविण्याचा उपक्रम होता, नियमित ध्यान योग केल्यास निश्चितच व्यसनापासुन परावृत्त होण्यास मदत होईल असा विश्वास दर्शविला आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी सदर कार्यक्रम प्रसंगी भावी पिढी निर्व्यनी घडविण्यासाठी ध्यान योग हा एक उत्तम मार्ग असुन शालेय व महाविद्यायीन विद्यार्थी यांनी याचा आत्मसात करुन नियमित ध्यान योग करावा असे आवाहन केले असुन सदर कार्यक्रम प्रसंगी नागरीकांनी, तरुणांनी तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी नशा न करणे बाबत शपथ घेवुन शपथ बोर्डावर स्वाक्षरी देखील केलेली आहे.
सदर ध्यान योग शिबीरात राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री महोदय मा.प्रा.डॉ.श्री अशोक उईके यांचे सह,. आमदार सुधीर मुनगंटीवार,. आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., विविध विभागाचे अधिकारी, शांतता समिती सदस्य, विविध समाज सेवी संघटनाचे पदाधिकारी, वरिष्ठ नागरीक, शहरातील विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच संदीप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र, नागपूर यांचे समवेत मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर सह जिल्हयातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, विविध ठाणे व विभागाचे प्रभारी अधिकारी व पोलीस स्टेशन व शाखेचे पोलीस अंमलदार मोठया संख्येने उपस्थित होते.
सदर ध्यान योग शिबीर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दल आणि श्री शिवकृपानंद स्वामी फाऊंडेशनचे सदस्यांनी अतिशय परिश्रम घेवुन सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला आहे.










