*भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांचा एकदिवसीय प्रशिक्षण वर्ग यवतमाळ येथे संपन्न
यवतमाळ – भारतीय कम्युनिस्ट पक्ष, जिल्हा यवतमाळतर्फे दि. ५ ऑक्टोबर २०२५ (रविवार) रोजी ‘मार्क्सवादी तत्त्वज्ञान म्हणजे काय आणि इतरांना कधी व कसे समजून सांगायचे’ या विषयावर कार्यकर्त्यांचा प्रशिक्षण वर्ग संपन्न झाला.
हा कार्यक्रम श्रमशक्ती बिल्डिंग, ४ था मजला, आर्णी रोड, एसटी डेपोसमोर, यवतमाळ येथे आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे प्रमुख शिक्षक म्हणून कॉ. प्रा.डाॅ. युगुल रायलू (नागपूर) यांनी प्रशिक्षण वर्ग घेतला. त्यांनी मार्क्सवादी तत्त्वज्ञानाचे सखोल विश्लेषण करत समाजव्यवस्थेतील वर्गसंघर्ष, श्रमिकांचे स्थान आणि वैज्ञानिक समाजवादाची गरज यावर सविस्तर भाष्य केले. उपस्थित कार्यकर्त्यांना तत्त्वज्ञानाचा गाभा समजावून घेत समाजपरिवर्तनासाठी सक्रिय होण्याचे आवाहन त्यांनी केले.तसेच भाकपचे नुकतेच चंडिगड(पंजाब) येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनाचा रिपोर्ट काॅ.अनिल हेपट यांनी मांडला.सोबतच शाहीर धम्मा खडसे यांनी आपल्या क्रांतीकारी गिताद्वारे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला हिम्मतराव पाटमासे यांचे अध्यक्षतेखाली कॉ.अनिल घाटे (जिल्हा सचिव), कॉ.अनिल हेपट (राज्य कौन्सिलर), कॉ.विजय ठाकरे, कॉ.प्रदिप नगराळे सर (जिल्हा सहसचिव), तसेच कॉ. गुलाबराव उमरतकर (जिल्हा कौन्सिलर) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
अतिथींनी आपल्या मनोगतातून कार्यकर्त्यांनी माक्सवादी विचारांचा अभ्यास करून जनतेच्या प्रश्नांवर संघटित लढा उभारावा, असे आवाहन केले.प्रशिक्षण वर्गाचे संचालन प्रदिप नगराळे यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हासचिव अनिल घाटी यांनी मानले.यशस्वितेसाठी
भारतीय कम्युनिस्ट पक्ष, जिल्हा व ता लुका यवतमाळ कौंसिलने अथक परिश्रम घेतले.










