चंद्रपूर पोलीसांची सर्वात मोठी कारवाई आरोपीकडुन ५२८ ग्रॅम एम.डी (MEPHEDRONE) ३५,०७,४८०/- रू मुद्देमाल जप्त
चंद्रपुर :
दि.०५/१०/२०२५ रोजीचे दुपारी १४.०० वा दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथील अधिकारी व अंमलदार यांना गुप्तबातमीदराकडुन माहिती मिळाली की, आज दुपारी वसीम इमदाद खान, रा. मुंबई हा त्याची कार कंमाक एमएच-१० ईक्यु-०४२१ ने चंद्रपरात एम.डी (MEPHEDRONE) ड्रग्ज पावडर विकी करीता घेवुन येणार आहे, अशा माहितीवरून नागपूर चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग कंमाक ३६३ वरील साखरवाही फाट्याजवळील एच.पी पेट्रोल पंप समोर येथे सापळा रचुन आरोपी नामे वसीम इमदाद खान, वय ३७ वर्ष, रा. बैगनवाडी रिक्षा स्टॅण्डजवळ, साईबाबा मंदिर, गोंवडी मुंबई यास कार एमएच-१० ईक्यु ०४२१ सह पकडण्यात आले. आरोपी वसीम इमदाद खान यांचेकडुन एका प्लास्टिकच्या प्रेसलॉक पन्नीमध्ये एम.डी (MEPHEDRONE) सदृश्य पांढरे रंगाचे ड्रग्ज पावडर, पन्नीसह निव्वळ वजन ५२८ ग्रॅम, बाजारभावानुसार प्रति ग्रॅम किमंत ५०००/-रू, एकुण किं २६,४०,०००/- रू पन्नीसह, वापरते मोबाईल, रोख रक्कम व कार असा एकुण ३५,०७,४८०/- रू मिळुन आल्याने गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अन्वये पंचनामा कार्यवाही करून जप्त करण्यात आले आहे.
नमुद आरोपीवर पोलीस स्टेशन पडोली जि. चंद्रपूर येथे गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन आरोपीस अटक करण्यात आले आहे.
सन २०२५ मध्ये एन.डी.पी.एस अधिनियम अन्वये चंद्रपूर जिल्हयात एकुण १५७ गुन्हे नोंद करून १९२ आरोपीवर कार्यवाही करण्यात आली. आरोपीकडुन एकुण ८०,५९,७७४/- रूपये चा माल जप्त करण्यात आला आहे.
गांजा विकीकरीता बाळणारे आरोपीवर २६ गुन्हे नोंद करण्यात आले असुन ५५.२४ किलो गांजा जप्त करून ४० आरोपीवर कार्यवाही करून ६,६२,१६४/- रू चा माल जप्त करण्यात आला.
एम.डी (MEPHEDRONE) ड्रग्ज पावडर बाळणारे आरोपीवर १४ गुन्हे नोंद करण्यात आले असुन ७२२.६१४ ग्रॅम एम.डी ड्रग्ज पावडर जप्त करून ३१ आरोपीवर कार्यवाही करून ४३,७८,०६०/-ダ चा माल जप्त करण्यात आला.
ब्राउन शुगर पावडर बाळणारे आरोपीवर ०१ गुन्हा नोंद करण्यात आला असुन २९८ ग्रॅम ब्राउन शुगर पावडर जप्त करून ०२ आरोपीवर कार्यवाही करून ३०,१९,५५०/- रू चा माल जप्त करण्यात आला.










