स्मृतिप्रीत्यर्थ पंचशील बौध्द विहार घुग्घुस बांधकामास पाच हजार रुपये दान
घुग्घुस – आज दिनांक 06/10/2025 रोजी भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुस पंचशील बौद्ध विहाराचे नवनवीत बांधकाम सुरू आहे.
पारिखाताई सम्राट कांबळे , यांनी स्मृतीषेश सम्राट कांबळे त्यांच्या प्रीत्यर्थ पाच हजार रुपये (5000) दान दिले.
भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुस चे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव विहार बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत आनंदराव पाझारे कार्याध्यक्ष चंदगुप्त घागरगुंडे यांनी एक संकल्पना आखली की वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, तिसरा दिवस न करता तो पैसा समाजाला दान करा जणे करुन तो पैसा योग्य ठिकाणी लावुन समाज घडविण्याचे काम होईल.
नवनवीत पंचशील बौद्ध विहाराचे बांधकाम हे लोक वर्गणीतून होत असल्याने बौद्ध बांधवांनी हि संकल्पना लक्षात घेऊन वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, तिसरा दिवस साजरा न करता विहार बांधकाम दान देत आहे.
भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुस चे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांनी पारिखाताई सम्राट कांबळे परिवारायांचे आभार मानले.
यावेळेस – अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव विहार बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत आनंदराव पाझारे
कार्याध्यक्ष चंदगुप्त घागरगुंडे, सल्लागार बबन वाघमारे आदी उपस्थित होते.










