महर्षि वाल्मीकि जयंती उत्साहात साजरी

16

महर्षि वाल्मीकि जयंती उत्साहात साजरी



समाजातील महिलांना साड्या व स्मृतिचिन्हांचे वाटप


घुग्घुस, दि. ०७ ऑक्टोबर :
भोई ढीवर समाज घुग्घुस व आई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नगर परिषद घुग्घुस येथे श्री महर्षि वाल्मीकि ऋषी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात समाजातील गरजवंत महिलांना साड्या व स्मृतिचिन्हे देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच समाजसेवक व मान्यवरांचा सत्कार करून सामाजिक एकतेचा व परस्पर सहकार्याचा संदेश देण्यात आला.
महर्षि वाल्मीकि हे भारतीय संस्कृतीतील ‘आदिकवी’ म्हणून ओळखले जातात. त्यांनी रामायण या महाकाव्याद्वारे सत्य, धर्म, आदर्श व मानवतेचा संदेश जनमानसात पोहोचविला. त्यांच्या जीवनातून आत्मशुद्धी, परिवर्तन आणि समाजसेवेचा प्रेरणादायी आदर्श मिळतो. वाल्मीकि ऋषींचे विचार आजही समाजाला एकता, समता आणि सदाचाराचा मार्ग दाखवतात.
या कार्यक्रमाला समाजातील मान्यवर, कार्यकर्ते, नागरिक तसेच नगरपरिषद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यामध्ये अर्चना दिनगलवार (कर निरीक्षक), अनिल डांगोरे (स्वच्छता निरीक्षक), शांताराम जाधव (कर निरीक्षक), विठोबा झाडे (लिपिक) आणि प्रविण ढोंगळे (अंतर्गत लेखा परीक्षक) यांची विशेष उपस्थिती होती.
उपस्थित मान्यवरांमध्ये अमोल माढंरे, रोशन प. पचारे, शंकर कामतवार, रोशन शा. पचारे, अजय माढरे, अविनाश कामतवार, दिलीप माढंरे, सुधाकर मांढरे, नथ्थुजी मांढरे, सारंग कामतवार, पांडुरंग कामतवार, गणेश शेडे, सुभाष मांढरे, आशाताई कामतवार, कविताई कामतवार, गोपिकाताई पचारे, छायाताई, कुसुमताई, मंगलाताई, गंगाबाई मांढरे तसेच समाज बांधव आणि आई फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here