चंद्रपुर आदिवासी मोर्चामध्ये अडथळा निर्माण होऊ नये म्हणून वाहतुकीत बदल करण्यापुर्वी अधिसूचना

25

चंद्रपुर आदिवासी मोर्चामध्ये अडथळा निर्माण होऊ नये म्हणून वाहतुकीत बदल करण्यापुर्वी अधिसूचना



चंद्रपूर : शहरात दिनांक १३/१०/२०२५ रोजी सकाळी १२/०० वाजता कोहीनुर ग्राउंड या ठिकाणा वरून आदिवासी समाज तर्फे त्यांच्या विविध मांगण्या करिता महा आकोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मोर्चात जिल्हयातील व जिल्ह्याबाहेरील मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी होत आहेत. सदर महा आक्रोश मोर्चा कोहीनुर ग्राउंड अंचलेश्वर गेट कस्तुरबा चौक गाधी चौक जयंत टॉकीज चौक जटपुरा गेट प्रियदर्शनी चौक जिल्हाधिकारी कार्यालय पंर्यतचा मार्ग असुन. नागरिकानी शक्तो या मार्गाचा वापर करण्यास टाळावे. सदर मोर्चामुळे वाहतुकीस अडथळा होवु नये तसेच मार्चातील आदिवासी बांधवाना अडथळा निर्माण होवु म्हणुन या मार्गावरील सर्व वाहतुक बंद ठेवणे आवश्यक आहे. —–
त्याअर्थी, आम्ही मुम्मका सुदर्शन (भापोसे), पोलीस अधीक्षक, चंद्रपूर आम्हाला मुंबई पोलीस अधिनियम-१९५१ च्या कलम ३३(१) (ब) नुसार सार्वजनिक ठिकाणी रहदारी व सुव्यवस्था राखण्यासाठी व नियमणासाठी प्राप्त असलेल्या कायदेशीर अधिकारान्वे चंद्रपुर शहरात आदीवासी समाज तर्फे महा आकोश मोर्चा करीता असलेल्या मार्गावरील रहदारी सुरळीत चालावी, रहदारीस कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होवुन नये व जनतेला त्रास अगर गैरसोय होवु नये म्हणुन वाहतुक व्यवस्थेमध्ये पुढील प्रमाणे बदल करणे बाबत अधिसुचना निर्गमित करीत आहे.
—-कोहीनुर ग्राउंड – अंचलेश्वर गेट – कस्तुरबा चौक गाधी चौक जयंत टॉकीज चौक – जटपुरा गेट प्रियदर्शनी चौक जिल्हाधिकारी कार्यालय पंर्यंतचा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांना बंद ठेवण्यात येत आहे. तसेच सदरचा रस्ता नो हॉकर्स झोन म्हणुन घोषीत करण्यात येत आहे. नागरिकानी या मार्गवर शक्यतो वाहने पार्किंग करू नये.

या कालावधीत सर्व वाहतुकदारांनी पुढील पर्यायी मार्गाचा वापर करावा

१) बल्लारपूर कडुन चंद्रपूर शहरामध्ये जाणारी वाहने (जड वाहने वगळून) अंचलेश्वर गेट कडुन गंजवार्ड कडे जाणाऱ्या मार्गचा वापर करतील.
२) नागपुर व मुल कडुन चंद्रपुर शहरातील पंचशिल चौक, श्री टॉकीज चौक, पठाणपुरा परीसर वार्ड मध्ये जाणा-या संत केवलराम येणा-या सर्व नागरिकांनी (जड वाहने वगळून) वरोरा नाका मित्र नगर चौक जेष्ठ नागरीक भवन-चौक – विदर्भ हाउसिंग चौक बिनबा गेट मार्गाचा वापर करावा.
 ३) नागपुर व मुल कडुन शहरामधील रामाळा तलाव, बगल खिडकी, गंज वार्ड, भानापेट वार्ड मध्ये जाणा-या सर्व नागरिकांनी (जड वाहने वगळुन सावरकर चौक बस स्टॅन्ड चौक आर. टी. ओक्ष. ऑफिस रयतवारी कॉलरी या मार्गाचा वापर करावा.

महा-आकोश मोर्चामध्ये सहभागी होणा-या नागरिकांनी खालील ठिकाणी वाहने पार्किंग करावे

१) बल्हारपुर कडुन येणा-या सर्व प्रकारची वाहने माता महाकाली मदीर समोरील बैल बाजार व महाकाली यात्रा ग्रांउड मध्ये आपली वाहने पार्किंग करावी.
२) मुल कडुन येणा-या सर्व प्रकारची वाहने मुल रोड वरील एस.बी.आय बँक समोरील ग्राउंड या ठिकाणी वाहने पार्किंग करावी
३) नागपुर कडुन येणा-या सर्व प्रकारची वाहने न्यु इंग्लिश ग्राउंड, (नागपुर-चंद्रपुर रोड) या ठिकाणी वाहने पार्किंग करावी
सदर अधिसूचना दि. १३/१०/२०२५ चे सकाळी ११:०० वा. पासुन ते सांयकाळी ०६:३० वा पर्यंत अंमलातराहील. तसेच सदर अधिसुचनेमध्ये वेळेनुसार बदल करण्यात येईल.
तरी नागरीकांनी मोर्चा दरम्यान वरील अधिसुचनेचे पालन करून शांतता व सुव्यवस्था अबाधीत राखणे कामी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
टिपः- सदर अधिसुचनेच्या कालावधीत शक्यतो अवजड वाहतुकदारांनी व इतर नागरीकांनी अत्यावश्यक कामाशिवाय या मार्गाचा वापर करू नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here