अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ७० हजार रुपयांची मदत जाहीर करावी –-भाकप व किसान सभेची मागणी.
वणी व राळेगाव उप.अधिकरयांना दिले निवेदन*
*वणी*– मागील दोन महिन्यापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे सरकारी आकडेवारीनुसार २७ लाख हेक्टर शेती बाधित झाली आहे. तरी प्रत्यक्षात ७० लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचे नुकसान झाले आहे. उभी पिके वाहून गेली, काही शेतात पाणी साचून पिके खराब झाली. सोयाबीनला कोंब आले व दाणे खराब होऊन काळे पडले. कपाशीची बोंडे सडली व पात्या खाली पडल्या. शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जनावरे व माणसाची प्राणहानी झाल्याचे निदर्शनास आले आहे.
पंजाब सारख्या तुलनेने लहान राज्याने अलीकडे पूरस्थिती हाताळत शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर ५०,००० रुपयांची तातडीची मदत जाहीर केली आहे. मात्र देशाची आर्थिक राजधानी असलेले आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने पंजाबपेक्षा मोठे असलेले महाराष्ट्र राज्य पूर्णतः वेगळ्या परिस्थितीत आहे. महाराष्ट्राचे भाजपचे मुख्यमंत्री कॉर्पोरेट घराण्यांना — अदानी, अंबानी — यांना सढळ हाताने मदत करतात, परंतु अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बाबतीत केवळ हेक्टरी ८,५०० रुपये मदत जाहीर करून शेतकऱ्यांप्रती असलेली अनास्था स्पष्ट केली आहे. करिता भाकप व किसान सभेने 9 व 10 आॅक्टों.ला राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती.त्याअंतर्गत वणी व राळेगाव येथे उपविभागीय अधिकारयांना निवेदन देण्यात आले.निवेदनात ताबडतोब शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी खालील मागण्यांवर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घेण्यास सांगीतले.
मागण्या :
1. अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ७०,००० रुपयांची मदत जाहीर करावी.
2. संपूर्ण कर्जमाफी त्वरित करावी.
3. कापूस व सोयाबीनची सरकारी खरेदी केंद्र सुरूवातीपासून सुरू करावी.
4. शिक्षणतज्ज्ञ व पर्यावरणप्रेमी सोनम वांगचुक यांची ताबडतोब सुटका करावी.










