खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते गजानन मासिरकर यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश!

15

खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते गजानन मासिरकर यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश!



मासिरकर यांच्या पक्षप्रवेशाने शहरात काँग्रेसला बळकटी


घुग्घूस : पाच वर्षाच्या प्रदीर्घ कालावधी नंतर घुग्घूस शहरातील नगरपरिषदेच्या
निवडणुका लागण्याची चाहूल लागली आहेत.
नगरपरिषदेच्या निवडणुकीचे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झालेले आहेत प्रभाग निहाय आरक्षण ही जाहीर झालेले आहेत सर्वच राजकीयपक्ष निवडणुकीच्या तैयारीला लागलेले आहेत
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने घुग्घूस नगरपरिषद पडोली जिल्हापरिषद व पंचायत समिती व नकोडा मारडा जिल्हापरिषद व पंचायत समितीची आढावा बैठक आज दिनांक 17 ऑक्टोबर रोजी तुकडोजी नगर वॉर्ड क्रं 06 येथे घेण्यात आली.
सदर आढावा बैठकीत खासदार प्रतिभाताई धानोरकर प्रभारी मुजीब पठाण, जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे,प्रवीण पडवेकर, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष दिनेश चोखारे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष सोहेल शेख, तालुका अध्यक्ष अनिल नरुले,शामकांत थेरे,एन. एस. यु. आय जिल्हाध्यक्ष शफक शेख,ज्येष्ठ नेते जयंता जोगी, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सादलावार, शामराव बोबडे, मुर्ली चिंतलवार,हनिफ शेख माजी उपसरपंच नकोडा, सुरज तोतडे माजी सरपंच पांढरकवडा, संध्याताई पाटील सरपंच मातरदेवी हितेश लोढे माजी उपसरपंच पांढरकवडा व मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
सदर बैठकीत काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणावर विश्वास ठेवत काँग्रेस नेते राहुल गांधीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तसेच शहर अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रसिद्ध व्यवसायिक तसेच सिव्हिल कॉन्ट्रक्टर गजानन मासिरकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.
खासदार धानोरकर व जिल्हाध्यक्ष धोटे यांनी मासिरकर यांच्या गळ्यात काँग्रेस पक्षाचा दुपट्टा घालून त्यांचे पक्ष प्रवेश घेतले मासिरकर हे ओबीसी समाजाचे तरुण नेतृत्व असल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसला बळ प्राप्त होणार असून मासिरकर हे सुद्धा ओबीसी गटातून निवडणूक लढविण्यास सज्ज झालेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here