स्थानिक युवकांच्या रोजगार हक्कासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा तीव्र संघर्ष
निलजई, ता. वणी, जि. यवतमाळ —
वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) निलजई प्रकल्पात स्थानिक युवकांना रोजगारापासून वंचित ठेवण्यात आल्याच्या निषेधार्थ
भारतीय कम्युनिस्ट पक्ष, वणी तालुका तर्फे 16 ऑक्टोबर 2025 रोजी ठिया आंदोलन व 17 ऑक्टोबर 2025 रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
ज्यांच्या जमिनीवरून कंपनी कोळसा काढते, त्याच भूमीतल्या युवकांना रोजगार न देणे हा अन्याय आहे.
काही जमिनीधारकांना नोकऱ्या देण्यात आल्या, परंतु भूमिहीन शेतमजूर युवकांना पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आले.
या सामाजिक व आर्थिक अन्यायाविरुद्धच हा संघर्ष उभारण्यात आला.
आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड अनिल हेपट(वणी विधानसभा क्षेत्र), कॉम्रेड अनिल घाटे (जिल्हा सचिव), कॉम्रेड मोरेश्वर कुंटलवार (तालुका सचिव) कॉम्रेड अथर्व निवडींग (AISF जिल्हा प्रमुख), पंढरी मोहितकर, भास्कर बकली, संभाशिव ताजने, संतोष तीतरे, यांनी केले.
आंदोलनादरम्यान “स्थानिकांना रोजगार द्या — बाहेरच्यांचा हस्तक्षेप थांबवा!” या घोषणांनी परिसर दुमदुमला.
पोलीस प्रशासनाने दबाव आणण्याचा प्रयत्न केला, पण कॉम्रेड अनिल हेपट यांनी ठाम शब्दांत सांगितले —
‘मागण्या मान्य करा, अन्यथा आमच्यावर गुन्हे दाखल करा; पण लढा थांबवणार नाही!’
शेवटी प्रशासनाला झुकावे लागले आणि स्थानिक युवकांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाने स्पष्ट केले आहे की —
स्थानिकांना रोजगार देणे हा दयेचा नव्हे, हक्काचा प्रश्न आहे.
हा लढा पुढेही सुरू राहील.










