भाजप महिला आघाडी तर्फे गरबा दांडीया महोत्सव २०२५ चे यशस्वी आयोजन…
घुग्घुस : भारतीय_जनता_पार्टी महिला आघाडी, घुग्घुस यांच्या वतीने दसरा मैदान, अमराई वार्ड येथे गरबा दांडीया महोत्सव २०२५ चे भव्य आयोजन करण्यात आले. या गरबा महोत्सवात महिलांनी आणि युवकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. आकर्षक पोशाख, संगीत आणि नृत्याने वातावरण दुमदुमले. विजेत्यांसाठी रेफ्रिजरेटर, LED टीव्ही, वॉशिंग मशीन, सायकल, स्मार्ट वॉच अशी बक्षिसे देण्यात आली. बेस्ट पर्फॉर्मर, ड्रेस, स्टॅमिना यांसाठीही विशेष पुरस्कार देण्यात आले. प्रत्येक स्पर्धकाला प्रोत्साहन म्हणून हॉटपॉट व बम्पर लकी ड्रा ठेवण्यात आला. हा सांस्कृतिक सोहळा अत्यंत यशस्वी ठरला. मलाही या कार्यक्रमात सहभागी होऊन आनंद झाला सर्व स्पर्धकांना आणि आयोजकांना अनेक शुभेच्छा!










