सफाई कामगारांच्या आंदोलनाला मिळवून दिला न्याय…
चंद्रपूर महानगरपालिकेअंतर्गत कार्यरत नाली सफाई कामगारांनी प्रलंबित मागण्यांसाठी सुरू केलेले कामबंद आंदोलन आपण मध्यस्थी करून संपवले. वेतनवाढ, प्रलंबित वेतन, कायमस्वरूपी नियुक्ती प्रक्रिया आणि दिवाळी बोनस या प्रमुख मागण्यांवर मी कामगार प्रतिनिधी आणि मनपा प्रशासनाशी सविस्तर चर्चा केली. चर्चेदरम्यान सर्व मुद्द्यांवर सकारात्मक तोडगा निघाला असून, प्रशासनाने कामगारांच्या सर्व मागण्या मान्य करून आजच दिवाळी बोनस देण्याचे आश्वासन दिले आहे.
मी स्वतः आंदोलनस्थळी जाऊन सफाई कामगारांशी संवाद साधला आणि त्यांना योग्य तो दिलासा दिला. शहराच्या स्वच्छतेसाठी महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या या कामगारांच्या मागण्यांबाबत न्याय्य तोडगा निघाल्याने सर्व कामगारांनी आनंदाने आंदोलन मागे घेतले. त्यांच्या भावनांचा आदर राखत प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. सफाई कामगार हे शहराच्या स्वच्छतेचे खरे रक्षक आहेत, त्यांचे हक्क आणि सन्मान कायम राखण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहीन.










