क्रांतिवीर शहीद बाबुराव शेडमाके यांना शहिद दिनानिमित्त आदरांजली
चंद्रपुर : क्रांतिवीर शहीद बाबुराव शेडमाके यांच्या शहिद दिनानिमित्त आज जिल्हा कारागृह परिसरातील शहीद बाबुराव शेडमाके स्मारक येथे त्यांच्या शहिद स्थळी स्मरण व आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित राहुन सर्वांनी शहीद बाबुराव शेडमाके यांच्या कार्याचे आणि बलिदानाचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले. यावेळी पालकमंत्री डॉ. प्रा अशोक उईके यांची उपस्थिती होती. तसेच राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्ष मा श्री हंसराज भैय्या अहिर, महानगर अध्यक्ष श्री.सुभाष कासनगोट्टूवार, भारतीय जनता पार्टी चे नेते श्री. प्रकाश देवतळे, अनुसूचित जमाती जिल्हाध्यक्ष श्री. जितेश कुळमेथे उपस्थित होते
या कार्यक्रमास भाजप चंद्रपूर महानगरचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मी सुद्धा या प्रसंगी उपस्थित राहून क्रांतिवीर शहीद बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.










