मुकुटबन येथे सुरू असलेल्या आयटकच्या नेत्रुत्वातील कामगारांच्या आंदोलनाला सहाव्या दिवशी विद्यमान आमदार संजय देरकर व माजी आमदार संजिवरेड्डी बोदकुरवारसह अनेक नेत्यांनी भेट देऊन पाठींबा दिला

47

मुकुटबन येथे सुरू असलेल्या आयटकच्या नेत्रुत्वातील कामगारांच्या आंदोलनाला सहाव्या दिवशी विद्यमान आमदार संजय देरकर व माजी आमदार संजिवरेड्डी बोदकुरवारसह अनेक नेत्यांनी भेट देऊन पाठींबा दिला



वणी — उपविभागातील मुकुटबन येथील कार्यरत RCCPL MP BIRLA या सिमेंट कंपनीमधिल काम करणारे कामगारांच्या समस्यांना घेऊन कामगार नेते कॉ.अनिल हेपट यांचे नेत्रुत्वात जनरल ईंडस्ट्रीज कामगार युनियन(आयटक) द्वारा दि.6 नोव्हें पासुन आंदोलन सुरू आहे आजचा सहावा दिवस आहे.अजुनही कंपणी प्रशासनाने मागण्यांवर दखल घेतली नाही.युनियनने आतापर्यंत कंपणी प्रशासन,पोलीस प्रशासन,तहसिलदार,जिल्हाधिकारी,कामगार न्यायालयात निवेदन देऊन कामगारांना न्याय देण्याची मागणी केली आाहे.आपल्या क्षेत्रात बाहेरच्या कंपण्या येऊन अशाप्रकारे कामगारांचे शोषण करीत असेल व आपल्यासोबत मग्रुरीने वागत असेल तर आपली जनता हे सहन करणार नाही अशा भावना जनता व्यक्त करीत आहे.आतापर्यंत सर्व गावातील बहुसंख्य सरपंचांनी,सर्व राजकीय पक्षांनी,विवीध सामाजिक संघटनांनी भेटी देऊन लेखी पाठींबा दिला.आज सहाव्या दिवशी क्षेत्राचे शिवसेना (उबाठा)चे आमदार संजयभाऊ देरकर व भाजपाचे माजी आमदार संजिवरेड्डीजी बोदकुरवार यांनी मुकुटबन येथे येऊन आंदोलनाला भेटी दिल्या,कामगारांचे प्रश्न समजुन घेतले,मार्गदर्शन करून आंदोसनाला पाठींबा दिला.दोन्ही लोकप्रिय नेत्यांनी शासनस्तरावर कामगाराच्या मागण्या संदर्भात पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.दोन्ही नेत्यांनी बोलतांना उल्लेख केला की मागील अनेक दिवसापासून मुकुटबन येथील RCCPL MP BIRLA कंपनीतील कामगारांचे कामबंद आदोलन सुरु आहे. कामगाराच्या मागण्या आहेत की कामगारांना किमान वेतनाप्रमाणे वेतन देण्यात यावे,कामाचे तास कामगार संहीतेप्रमाणे ठेवावे,वातावरण सुविधाजनक ठेवावे,सुरक्षा साधने पुरविण्यात यावे, कायद्या प्रमाणे वेतनवाढ करण्यात यावे, कामगारांना PF नियमित जमा करण्यात यावे अशा विविध मागण्या आहेत. या संपूर्ण मागण्या योग्य असल्याचे सांगितले. त्यांनी याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून कामगारांचे मागण्या पूर्ण करण्या करिता सदैव कामगाराच्या पाठीशी उभा राहणार असल्याचे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here