श्री.दिलीप कोरपेनवार यांच्या स्मृति प्रित्यर्थ सामान्य ज्ञान स्पर्धेचा आयोजन

16

श्री.दिलीप कोरपेनवार यांच्या स्मृति प्रित्यर्थ सामान्य ज्ञान स्पर्धेचा आयोजन



वणी: रविवारी, दिनांक 14 सप्टेंबर रोजी स्व. श्री दिलीप कोरपेनवार सर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सामान्य ज्ञान स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला विद्यार्थ्यांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. विजय चोरडिया मित्रपरिवार व स्माईल फाउंडेशन (NGO), वणी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला होता. या स्पर्धेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. लवकरच बक्षिस वितरण सोहळा आयोजित करण्यात येणार असून सर्व विजेत्या स्पर्धकांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती स्माईल फाउंडेशनचे अध्यक्ष सागर जाधव यांनी दिली.  

वणी येथील श्री विनायक मंगल कार्यालय, छोरियालेआउट, गणेशपूर येथे ही स्पर्धा घेण्यात आली होती. सुमारे 1800 विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. तीन गटांमध्ये ही घेण्यात आली होती. यात वर्ग 4 ते 5 ‘अ’ गट, वर्ग 6 ते 8 ‘ब’ गट आणि वर्ग 9 ते 12 ‘क’ गट असे गट होते. स्पर्धेत वणी तालुक्यातील विद्यार्थ्यांसह मारेगाव, झरी, पांढरकवडा, वरोरा आदी तालुक्यांतील विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता.

‘अ’ गटात जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा, डोलडोंगरगाव येथील वैभव बुटले यांनी प्रथम क्रमांक पटकावला, स्वर्ण लीला इंटरनॅशनल स्कूल येथील चिन्मय डेंगळे याने दुसरा क्रमांक पटकावला तर ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल स्कूल येथील विहान गोसावी या विद्यार्थ्याने तिसरा क्रमांक पटकावला तर ‘ब’ गटात स्वर्ण लीला इंटरनॅशनल स्कूल येथील स्वरा शेडामे हिने प्रथम क्रमांक मिळवला. स्वर्ण लीला इंटरनॅशनल स्कूल येथील अंश सेनामे याने दुसरा क्रमांक पटकावला तर मायक्रोन स्टूडेंट अकॅडमी वणी येथील सृष्टी राशीकर या विद्यार्थिनीने तिसरा क्रमांक पटकावला ‘क’ गटात लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी येथील ओम पानघाटे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तर स्वर्ण लीला इंटरनॅशनल स्कूल येथील गुरुपे सिंग मुथाने ज्या याने दुसरा क्रमांक पटकावला तर स्वर्ण लीला इंटरनॅशनल स्कूल येथील विद्यार्थी दर्श मदान याने तिसरा क्रमांक पटकावला

सामान्य ज्ञान स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदविला. या स्पर्धेत ‘अ’ गटात जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा, डोलडोंगरगाव येथील वैभव बुटले यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर स्वर्ण लीला इंटरनॅशनल स्कूल येथील चिन्मय डेंगळे याने दुसरा क्रमांक मिळवला. ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल स्कूल येथील विहान गोसावी या विद्यार्थ्याने तिसरा क्रमांक पटकावला. ‘ब’ गटात स्वर्ण लीला इंटरनॅशनल स्कूल येथील स्वरा शेडामे हिने प्रथम क्रमांक मिळवला, तर त्याच शाळेतील अंश सेनामे याने दुसरा क्रमांक पटकावला. मायक्रोन स्टुडेंट अकॅडमी, वणी येथील सृष्टी राशीकर हिने तिसरा क्रमांक मिळवला. ‘क’ गटात लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी येथील ओम पानघाटे यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर स्वर्ण लीला इंटरनॅशनल स्कूल येथील गुरप्रीतसिंग मुथानेजा याने दुसरा क्रमांक मिळवला. तसेच स्वर्ण लीला इंटरनॅशनल स्कूल येथील दर्श मदान याने तिसरा क्रमांक पटकावला.

‘अ’ गटातून 13 विद्यार्थी, ‘ब’ गटातून 14 विद्यार्थी, तर ‘क’ गटातून 13 विद्यार्थी — अशा एकूण 40 विद्यार्थ्यांची पुढील टप्प्यासाठी निवड करण्यात आली आहे. लवकरच एका भव्य सोहळ्यात या सर्व 40 विजेत्या स्पर्धकांचा रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. याची सविस्तर माहिती मीडिया मधून देण्यात येईल, अशी माहिती सागर जाधव यांनी दिली. तसेच अधिक माहितीसाठी 7038204209 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

स्पर्धेसाठी विस्तार अधिकारी रमेश बोबडे, संजय पिदुरकर, दत्तात्रय पुलेंवार, चंदू परेकर, देवेंद्र खरवडे, दिगंबर ठाकरे यांनी पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.  स्पर्धेच्या आयोजनासाठी स्माईल फाउंडेशनचे पदाधिकारी व स्वयंसेवक — पियूष आत्राम, आदर्श दाढे, डॉ. विश्वास सुंदरानी, उत्कर्ष धांडे, खुशाल मांढरे, भोयर सर, ताजणे मॅडम, संजय पिदुरकर, रोहित ओझा, रोनक बदखल आणि सिद्धार्थ साठे — यांनी परिश्रम घेतले. त्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ही स्पर्धा अत्यंत यशस्वीरीत्या पार पडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here