लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनतर्फे ग्रामीण पशुधन आरोग्य संरक्षणासाठी जनावरांची आरोग्य तपासणी व लसीकरण शिबिर

22

लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनतर्फे ग्रामीण पशुधन आरोग्य संरक्षणासाठी जनावरांची आरोग्य तपासणी व लसीकरण शिबिर



चंद्रपूर : ग्रामीण भागातील पशुधनाचे आरोग्य सुदृढ ठेवून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यास बळकटी देण्यासाठी लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनतर्फे माहे , सप्टेंबर ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत पशु आरोग्य तपासणी व लसीकरण मोहिमेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते .
या उपक्रमाचा उद्देश पशुधनाला संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण देणे, त्यांचे उत्पादन वाढविणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे हा होता.
या अंतर्गत चंद्रपूर तालुक्यातील वढा, पांढरकवडा, उसगाव, म्हातारदेवी, बेलसणी, मुरसा, शेणगाव आणि धानोरा या आठ गावांमध्ये आरोग्य शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांमध्ये एकूण २,८७६ पशूंची तपासणी व लसीकरण करण्यात आले. या दरम्यान गाई ४१७, बैल ६९९, म्हशी २०९ आणि शेळ्या १,२५१ जनावरांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन सहायक महाप्रबंधक विद्या पाल यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उसगाव, म्हातारदेवी, बेलसणी, मुरसा, वढा, पांढरकवडा आणि शेणगाव गावांचे सरपंच — सौ. निवेदिता ठाकरे, सौ. संध्या पाटील, सौ. इंदिरा पोळे, सौ. पुष्पाताई मासिरकर, तसेच श्री. किशोर वरारकर, श्री. सुरज तोतडे, श्री. विजय आगरे, श्री. सुनिल मोरे, व्यवस्थापक डॉ. आदित्य कदम, उपव्यवस्थापक श्री. दिपक साळवे आणि गावातील नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिरांमध्ये घुग्गुस, पांढरकवडा व मुरसा येथील सरकारी पशुवैद्यकीय अधिकारी — डॉ. विनोद रामटेके, डॉ. बागडे मॅडम आणि डॉ. भागवत यांचा सक्रिय सहभाग होता. या दरम्यान जनावरांचे आरोग्य तपासणे , लसीकरण करणे तसेच योग्य पशुपालनाच्या पद्धतीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन तज्ञा मार्फत करण्यात आले .
विशेषतः पशुधनामध्ये पसरत असलेल्या FMD (Foot and Mouth Disease) आणि LSD (Lumpy Skin Disease) या घातक व संसर्गजन्य रोगांविरुद्ध लसीकरण करण्यात आले. याशिवाय गाई व बकऱ्यांसाठी मल्टिव्हिटामिन आणि फॉस्फरस लसींचे लसीकरण करण्यात आले, त्यामुळे जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्यांची उत्पादकता सुधारेल. नियमित पोषक आहार आणि पूरक लसीकरणामुळे पशुधन अधिक निरोगी राहून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास हातभार लागेल.
लसीकरणाचे महत्त्व अधोरेखित करताना पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की —
“FMD आणि LSD हे अत्यंत संसर्गजन्य व आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक रोग आहेत. नियमित लसीकरणामुळे जनावरांना या रोगांपासून संरक्षण मिळते, दूध उत्पादन वाढते आणि पशुधनाचे आरोग्य सुदृढ राहते. संपूर्ण कळपाचे लसीकरण केल्यास रोगांचा प्रसार प्रभावीपणे रोखता येतो.”
या शिबीरा दरम्यान ५५१ मिनरल मिश्रण पॅक, ५३२ मिनरल वीटा आणि २२३ स्प्रे बाटल्या शेतकऱ्यांना वितरित करण्यात आल्या. या वस्तूंचा वापर करून दूध देणाऱ्या जनावरांची उत्पादनक्षमता वाढविणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.
पशुधन आरोग्य तपासणी व लसीकरण शिबीरा मध्ये शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दिलेल्या प्रतिक्रिये शिबिरामुळे त्यांच्या जनावरांचे आरोग्य सुधारले असून आजारांचे प्रमाण घटले आहे. पशुधनाचे आरोग्य सुधारल्याने दूध उत्पादनात वाढ झाली असून त्यांच्या आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल दिसून येत आहे.
या प्रसंगी लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनच्या सहायक महाप्रबंधक विद्या पाल म्हणाल्या —
“ग्रामीण विकासात पशुधनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पशुधन निरोगी राहिले तर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होते. म्हणूनच लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशन पशुधन आरोग्य व शेतकरी सक्षमीकरणासाठी अशा शिबिरांचे आयोजन सातत्याने करत राहील.”
या पशु आरोग्य तपासणी व लसीकरण मोहिमेच्या यशस्वीतेसाठी शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे व्यवस्थापक डॉ. आदित्य कदम , डॉ. महेंद्र वैरागडे, श्री महेश उपरे, श्री मानस मकासरे, श्री गजानन बोबडे, श्री आदित्य मोहितकर, श्री अभिजित चौधरी, श्री धनंजय पिंपळशेंडे आणि गावातील ORW टीम यांनी परिश्रम घेतले. त्यांच्या समन्वयामुळे हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनने या उपक्रमातून केवळ जनावरांचे लसीकरण केले नाही, तर पशुधन आरोग्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकासासाठी एक ठोस आणि शाश्वत पाऊल उचलले आहे.
या माध्यमातून “आरोग्यदायी पशुधन – समृद्ध शेतकरी” ही संकल्पना वास्तवात उतरविण्याचा प्रयत्न होत आहे.असे शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे व्यवस्थापक डॉ. आदित्य कदम यांनी म्हटले
लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशन — ग्रामीण विकास, शेतकरी सक्षमीकरण आणि पशुधन आरोग्यासाठी सतत प्रयत्नशील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here