सीटू संघटनेचा कुष्ठरोग सर्वे न करण्याचा निर्णय लाल बावटा आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन ( CITU ) चा जिल्हा कमिटीतनिर्णय
_ ________________________
यवतमाळ : जनतेचा आरोग्यासाठी सातत्याने आरोग्य विभागाचा प्रत्येक योजनेत आपल्या जीवाची पर्वा न करता कार्य करणाऱ्या आशा वर्कर यांना मात्र सरकार कडून वेतन न देता फार कमी मानधनावर त्यांच्याकडून काम करून घेतात. क्षयरोग, कुष्ठरोग, हत्तीपाय, पोलिओ, थुंकी नमुने, मातृत्व वंदन आदींच्या सर्वे दरवर्षी करवून घेतल्या जाते. परंतु गेल्या तीन वर्षापासून ह्या सर्व कामांचा अजूनही मानधन न मिळाल्याने ह्या वर्षी कुष्ठरोगाचा दिनांक १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर पर्यंत करण्यात येणाऱ्या सर्वे न करण्याच्या निर्णय लाल बावटा आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन ( सीटू ) च्या दिनांक १६ नोव्हेंबर २०२५ रोजी यवतमाळ येथे झालेल्या जिल्हा अध्यक्ष कॉ. कुमार मोहरमपुरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा कमिटीचा बैठकीत घेण्यात आला.
या वर्षी कुष्ठरोग ह्या आजाराचे रुग्ण शोधण्याचा सर्वे आशा वर्कर यांनी करावा असा आदेश आरोग्य विभागाकडून मिळाल्यानंतर लाल बावटा आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन सीटू चे वतीने संबंधित विभागांना गेल्या तीन वर्षापासून केलेल्या वेगवेगळ्या योजनांच्या सर्वेचे मानधन अजूनही न मिळाल्याने जोपर्यंत जुन्या केलेल्या सर्वेचे मानधन देणार नाही तोपर्यंत यावर्षीचा नवीन कुष्ठरोग सर्वे करणार नाही असे निवेदन दिनांक ३/११/२०२५, १०/११/२०२५ व १४/११/२०२५ रोजी संघटनेचा जिल्हा सचिव कॉ. उषा मुरखे यांचे नेतृत्वात देण्यात आले. ह्या निवेदनावर फक्त जिल्हाधिकारी यांनी सर्वे करा, मानधन टाकण्यात येईल असे तोंडी आश्वासन दिले. परंतु गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आहे की, अधिकारी वर्ग काम काढून घेण्यासाठी आश्वासन देतात आणि काम झाल्यावर विसरून जातात. आशा संघटना ह्यावर सातत्याने आंदोलन करीत राहतात. एवढेच नाही तर तीन तीन चार चार महिने वेतन सुद्धा दिल्या जात नाही. त्यातच पेमेंट स्लिप सुद्धा दिल्या जात नाही. त्यामुळे वास्तविकतेत कोणत्या कामाचे किती पैसे मिळाले हे सुद्धा समजत नाही. त्यामुळे दर महिन्याला पेमेंट स्लिप सुद्धा देणे अनिवार्य आहे ही सुद्धा संघटनेची मागणी गेल्या कित्येक वर्षापासून केल्या जात आहे. करिता यावर्षी जोपर्यंत जुन्या सर्वेचा मोबदला आधी दिल्या जात नाही तोपर्यंत यावर्षीचा नवीन सर्वे करण्यात येणार नाही असा निर्णय लाल बावटा आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन सीटू च्या दिनांक १६ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या जिल्हा कमिटीचा बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीला जिल्हाध्यक्ष कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी, जिल्हा सचिव कॉ. उषा मुरखे, प्रीती करमरकर, सुजिता बैस, वंदना बोकसे, अर्चना सावरकर, छाया क्षीरसागर, अर्चना चौधरी, अलका नागपुरे, संगीता डवले, संगीता ढेरे, लीना गांजरे आदी जिल्हा कमिटी सदस्य उपस्थित होते.