के.व्ही.आर.आर.कौळसा प्रकल्प कोलगाव येथे स्थानिक विस्थापितांना नोकरीत घ्या,भाकपची मागणी*
*वणी*– कोलगाव परिसरात के.व्ही.आर.आर.नावाची कोळसा खदान सुरु करण्यातआली आहे.या कंपणीने कोलगाव,टाकळी,चीखली,येनक या चार गावची शेतजमीन कोळसा प्रकल्पासाठी घेतली आहे.शेती गेल्यामुळे तो शेतकरी आता शेतमजूर झाला आहे.या विस्थापित झालेल्या शेतमजुरांना नोकरीची अत्यंत गरज आहे.करिता कंपनीने प्रथम प्राधान्याने स्थानिक युवकांना नोकरीवर सामावुन घ्यावे अशा आशयाचे निवेदन भारतीय कम्युनिस्ट पक्षाने दिनांक 18/11/2025 ला के. वी. आर. आर. कंपनीचे एच.आर.भावेश राज यांना कोलगाव कार्यालयात दिले. याप्रसंगी कोलगाव, टाकळी, चिखली, येनक, यां चार गावातील शेतमजूर युवकांसोबत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव कॉम्रेड मोरेश्वर कुंटलवार, कॉम्रेड वसंता कोट्टे, कॉम्रेड रवी गोरे,सुनिल उपरे उपस्थित होते.