वरोरा, २१ नोव्हेंबर २०२५: बालदिनानिमित्त उपजिल्हा सामान्य रुग्णालय वरोरा येथील ART सेंटरमध्ये एच आय व्ही सहज जगणाऱ्या बालकांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रम डॉ. श्रीकांत जोशी व मा. जोसेफ डोमाला यांचे मार्गदर्शना खाली आयोजित करण्यात आले तसेच विहान समग्र केअर अँड सपोर्ट सेंटर, वरोरा (क्राइस्ट हॉस्पिटल – चांदा डायोसिस सोसायटी, चंद्रपूर) यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला .या कार्यक्रमात बालकांनी जास्तीत-जास्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. सिस्टर अँटॉनिया मॅडम (St. Anne हाय स्कूल वरोरा) यांनी भूषविले. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मा. वंदना विनोद बरडे मॅडम (सहाय्यक अधिसेविका उपजिल्हा सामान्य रुग्णालय, वरोरा प्रमोद म्हशाखेत्री Art समुपदेशक, परवीन खान Art समुपदेशक,.ऍलीन शिमॉन (Art औषधी निर्माता), . अमोल मोरे (DM).आशा कवाडे (CCC) आणि . रीना रामटेके (प्रकल्प समन्वयक विहान), श्रीमती.निशा वखनोर व श्रीमती. पौर्णिमा खोब्रागडे CLH आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात पंडित जवाहर नेहरू याच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलन करुन करण्यात आले तसेच कार्यक्रमा दरम्यान मुलांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. वंदना विनोद बरडे अधीसेवीका यांनी आपल्या मार्गदर्शन करतांना सांगितले कि, उत्तम आरोग्य राखण्याकरिता योग्य असा सकस व संतुलित आहार घ्यावे .योगा प्राणायाम,मेडिटेशन,करावे सर्व प्रकारच्या कळधान्य, हिरव्या पालेभाज्या, सर्व प्रकारचे फळ,यांचा वापर करावा.कधीही कुठल्याही परिस्थितीत हार न मानता त्या समस्येला अडचणीला तोंड देवुन योग्य मार्ग निवळावा व जिवन सुखकर करावे.अभ्यास करून स्पर्धा परीक्षा मध्ये भाग घेऊन चांगल्यात चांगली कामगिरी, नोकरी करावी.तर अँटॉनिया यांनी आपल्या मार्गदर्शनातू सांगितले कि, स्वतः ला इतरांन पेक्षा वेगळे न समजता सर्व छंद जोपासावे त्यानंतर मुलांना प्रोत्साहन पर भेटवस्तू देण्यात आले.तसेच बालकांनी निबंध, कविता सादर केले व त्याचा पालकांनीही उत्साहाने सहभाग घेतला.कार्यक्रमाचे शेवट इतनी शक्ती हमें देना दाता या प्रार्थनेने करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्प समन्वयक श्रीमती. रीना रामटेके यांनी केले, तर आभार प्रदर्शन CLH श्रीमती.निशा वखनोर यांनी मानले. या कार्यक्रमाचे प्रायोजक st. एनि हाय स्कूल वरोरा व वंदना विनोद बरडे सहायक अधीसेवीका यांनी सहकार्य केले.
बालकांच्या चेहऱ्यावर एक उत्साहीत ,आनंद उमटवणारा व प्रेरणादायी संदेश देणारा हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.