ब्रम्हपुरी येथे माय हेल्थ प्रो स्पा अॅण्ड वेलनेस सेंटर, स्थानिक गुन्हे चंद्रपुरची शेषनगर येथे P.I.T.A अधिनियम अन्वये कारवाई
चंद्रपुर : दि.२२/११/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व अंमलदार यांचे पथक चंद्रपूर जिल्हात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्तबातमीदार यांचेकडुन माहिती मिळाली की, ब्रम्हपुरी येथील माय हेल्थ प्रो स्पा वेलनेस सेंटर येथे आसामी महिलांकडुन वेश्याव्यवसाय करवुन घेत आहे, अशा माहितीवरून अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ अन्वये तसेच महाराष्ट्र शासनाचे निर्णयानुसार विशेष पोलीस अधिकारी म्हणुन पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी, पोलीस स्टॉफ, बनावट गि-हाईक, समाजसेविका, महिला पंच यांचे उपस्थितीत धाड टाकुन कारवाई केली असता मिझोरम व नागालैंड येथील तीन पिडीत महिलाची सुटका करण्यात आली. स्पा सेंटर चा मॅनेजर करण गंगाधर मोहजनकर,(२४व्यवसाय मॅनेजर, माय हेल्थ प्रोस्पा अॅण्ड वेलनेस सेंटर, शेषनगर, खिस्तानंद चौक, ब्रम्हपुरी रा. पांजरेपार, ता. नागभिड, जि. चंद्रपूर यास ताब्यात घेण्यात आले असुन स्पा मालक पाहिजे आरोपी प्रितीश बुर्ले, रा. ब्रम्हपुरी हा सध्या फरार आहे. पंचनामा कारवाई दरम्यान रोख रक्कम, मोबाईल, रजिस्टर, पावती बुक, स्कॅनर, कंडोम पाकीट असा एकुण १८०६०/-रू चा माल जप्त करण्यात आला असुन आरोपीविरूध्द पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधि १९५६ कलम ३,४,५,७ अन्वये गुन्हा नोदं करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा.श्री.सुदर्शन मुम्मका पोलीस अधीक्षक चंद्रपूर, मा.श्री. ईश्वर कातकडे अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात श्री. अमोल काचोरे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर, श्री.प्रमोद बानबले, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी, श्रीमती शितल खोब्रागडे सपोनि, पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोहवा/जंयत चुनारकर, नितेश महात्मे, छाया निकोडे, निराशा तितरे, अपर्णा मानकर, पोलीस अंमलदार प्रफुल्ल गारघाटे, प्रदिप मडावी, अजित शेन्डे, सुमित बरडे, दिनेश आराडे, समाजसेविका श्रीमती सरिता राजेद्र मालु, माया सुनिल मेश्राम, हर्षा संदिप वानोडे यांनी केली. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर व पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी यांनी संयुक्तरित्या केली आहे.