विदर्भ टाउनशिप, देवाला येथुन चोरी झालेले १७.६८.०००/- रूपयाचे सोन्याचे दागीने आरोपीसह पकड़ने.

12

विदर्भ टाउनशिप, देवाला येथुन चोरी झालेले १७.६८.०००/- रूपयाचे सोन्याचे दागीने आरोपीसह पकड़ने.

स्थानिक गुन्हे शाखा,चंद्रपुर यांनी जप्त केली

चंद्रपुर :
दिनांक २०/११/२०२५ रोजी फिर्यादी नामे विना विरेंद्र कुभरे, वय ४३ वर्ष, रा. विदर्भ टाउनशिप, देवळा, चंद्रपुर, जि. चंद्रपुर यांनी पोलीस स्टेशन, पडोली येथे तक्रार दिली की, दिनांक १६/११/२०२५ रोजी यातील फिर्यादी ही तिचे मुलीसह नातेवाईकाचे पांढरकवडा येथे जात असल्याने तिचेकडील सोन्याचे व चांदीचे दागीने हे घरासमोर गेटचे आतमध्ये ठेवलेल्या स्वफ्ट चार चाकी वाहनामध्ये ठेवुन बाहेर गावी गेली. दिनांक २०/११/२०२५ रोजी फिर्यादी ही मुलीसह घरी येवुन चार चाकी वाहनामध्ये ठेवलेले सोन्याचे व चांदीचे दागीने पाहीले असता सोन्याचे, चांदीचे दागीने कोणी तरी अज्ञात चोराने चोरून नेले अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन, पडोली येथे अप. क्रमांक १७५/२०२५ कलम ३०३(२) भारतीय नागरीक सुरक्षा सहिता सन २०२३ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्हयाचे गांर्भीय पाहता, सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेणे कामी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील उप-विभाग, चंद्रपुर पथकातील अधिकारी व कर्मचारी असे मा. पोलीस अधिक्षक सा. यांचे मार्गदर्शनात तसेच पोलीस निरीक्षक, स्थागुशा यांचे नेतृत्वात चंद्रपुर शहर परिसरात रवाना होवुन घटनास्थळाचे आजु-बाजुच्या परिसरातील सी.सी.टि.व्ही. फुटेज व गोपनिय बातमिदाराकडुन माहिती घेवुन अथक परिश्रम घेवुन तांत्रिक पध्दतीने कौशल्यापुर्ण तपास करून आरोपी नामे समीर अशोकराव सातपुते, वय-२१ वर्ष, रा. स्वावलंबीनगर, नगिनाबाग, चंद्रपुर, ता. जि. चंद्रपुर यास ताब्यात घेवुन अधिक विचारपुस करून त्याचेकडुन सोन्याचे १४५ ग्रॅम व चांदीचे ८० ग्रॅम दागीने असा एकुण १७,६८,०००/- रूपयाचे माल जप्त करण्यात आला.
आरोपीचे नाव :- समीर अशोकराव सातपुते, वय-२१ वर्ष, रा. स्वावलंबीनगर, नगिनाबाग, चंद्रपुर, ता. जि. चंद्रपुर
जप्त माल :-सोन्याचे व चांदीचे दागीने असा असा एकुण १७,६८,०००/-
सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन साहेब चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले,, पोउपनि सुनिल गौरकार, पोहवा/सुभाष गोहोकार, पोहवा/सतिश अवथरे, पोहवा/रजनिकांत पुठ्‌ठावार, पोहवा/दिपक डोंगरे, पोहवा/इम्रान खान, पोशि/हिरालाल गुप्ता, पोअ/किशोर वाकाटे, पोअ/शशांक बदामवार सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here