“नागभीड पोलीसांनी कान्पा जंगल परीसरात वेगवेगळया ठिकाणी मोहा हातभट्टी अड्डड्यावर धाड

11

“नागभीड पोलीसांनी कान्पा जंगल परीसरात वेगवेगळया ठिकाणी मोहा हातभट्टी अड्डड्यावर धाड

चंद्रपुर :  दि, 24.11.2025 रोजी पो.स्टे. नागभीड अंतर्गत कान्पा परीसरातील जंगलात अवैध मोहा हातभट्टी दारू अड्डड्याबाबत गोपनिय माहीती काढुन पुढील प्रमाणे कार्यवाही करण्यात आलेल्या आहेत. 01) फरार आरोपी नामे आदित्य प्रदिप उके वय 26 वर्षे रा. कान्पा हा जंगलात हातभट्टी लावुन मोहा दारू गाळीत असताना त्याचे कडे मोहादारू 250 लिटर व मोहाफुल सडवा 1800 लिटर व साहीत्य असे एकुण किंमत 1,17,500/- रूपये चा मुद्देमाल मिळुन आला. 02) फरार आरोपी नामे रोहीत प्रकाश अलोने वय 27 वर्षे रा. कान्पा हा जंगलात हातभट्टी लावुन मोहा दारू गाळीत असताना त्याचे कडे मोहादारू 205 लिटर व मोहाफुल सडवा 1500 किलो व साहीत्य असे एकुण किंमत 99,600/-रूपये चा मुद्देमाल मिळुन आल्याने नमुद दोन्ही फरार आरोपी विरूध्द महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये कार्यवाही करून सदर मोहादारू तसेच मोहासडवा नाशवंत असल्याने पंचासमक्ष एकुण 2,17,100/- रुपयेचा मुद्देमाल घटनास्थळी नाश करण्यात आला.
सदरची कार्यवाही मा.श्री. मुम्मका सुदर्शन पोलीस अधिक्षक, मा. श्री. ईश्वर कातकडे अपर पोलीस अधिक्षक मा.श्री. राकेश जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी, ब्रम्हपुरी यांचे मार्गदर्शनाखाली श्री. रमाकांत कोकाटे पोलीस निरीक्षक पो.स्टे. नागभीड यांचे नेतृत्वात पो.उपनि. अजिंक्य गोविंदलवार, पोलीस अंमलदार किशोर देशमुख, भरत घोळवे, ज्ञानेश्वर गिरडकर, विशाल पेंदाम, संदिप मडावी चालक पो.हवा. दामोदर करंबे यांचे पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here