बुध्दा रेलवे लाइन च्या निर्माण कार्य बंद च्या ठिकाणी भंगार चोरट्यांची टोळी सक्रिय, पोलीस निरीक्षक यांच्या साठी गाठीने तर नाही ना?
डिबी पथक यांचे दुर्लक्ष का: मुग गिळून गप्प तर नाही ना?
घुग्घुस :- परिसरातील बंद पडलेल्या बुद्धा कंपनी परिसरातून गेल्या काही महिन्यांपासून लोखंडी सलाख्या, तांब्याच्या सेटिंग प्लेट्स, लोखंडी पाइप, वाहनांचे वजनाचे बॅकेट तसेच ट्रकचे विविध स्पेअर पार्ट्स मोठ्या प्रमाणात चोरीला जात असल्याची गंभीर माहिती स्थानिक सूत्रांकडून पुढे आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही सुरक्षा रक्षकांनी काही चोरट्यांशी संगनमत करून रात्री साधारण १ ते १.३० वाजताच्या सुमारास ट्रॅक्टरच्या साहाय्याने लोखंडी साहित्य चोरी करून ते जंगल परिसरात लपवून ठेवल्याची चर्चेला जोर आला आहे. या घटनेत घुग्घुस पोलीस ठाण्यातील संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका गांभीर्याने तपासण्याची गरज असल्याचीही चर्चा स्थानिक नागरिकांत आहे.
तसेच, या प्रकरणात काही RPF अधिकाऱ्यांचेही चोरट्यांशी संबंध असल्याच्या तक्रारी पुढे येत असून यामुळे जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. बंद पडलेल्या बुद्धा कंपनी परिसरात रेल्वे पुलाच्या कामाच्या काळात रक्षकच भक्षक बनत असल्याचा आरोप करण्यात येत असून या सर्व प्रकारांवर तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
स्थानिक नागरिक व सामाजिक संघटनांनी पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांनी या गंभीर प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करून चौकशीचे आदेश द्यावेत, तसेच या कथित भंगार चोरट्यांच्या टोळीवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. तसेच रात्रीच्या सुमारास पोलीस गस्त वाढवून चोरीस आळा घालण्याची आवश्यकता असल्याचेही नागरिकांनी स्पष्ट केले आहे.






