जिलाधिकारी यांनी ईव्हीएम मशीन ठेवण्याचा सुरक्षा कक्ष तसेच मतदान केंद्राची पाहणी केली
घुग्घुस :येथे आज मा.चंद्रपुर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी नगर परिषद घुग्घुस येथील ईव्हीएम मशीन ठेवावयाचा सुरक्षा कक्ष व जनता विद्यालय घुग्घुस येथील आठ मतदान केंद्रे यांची सविस्तर पाहणी केली व मा. उपविभागीय अधिकारी चंद्रपूर विशालकुमार मेश्राम, मा. निवडणूक निर्णय अधिकारी नगर परिषद घुग्घुस तथा तहसीलदार चंद्रपूर विजय पवार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी नगर परिषद घुग्घुस निलेश रांजणकर व अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नायब तहसीलदार ओंकार ठाकरे यांना मतदार यांना सहाय्य करण्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक करण्यासंबंधी, मतदान केंद्रांवर सर्वांना आवश्यक त्या सोयीसुविधा देण्यासंबंधी आणि मतदान पथकांना जास्तीत जास्त व अचूक प्रशिक्षण देण्यासंबंधी सूचना केल्या.