अवैधरित्या गौवंशची वाहतुक करणाऱ्यांविरुध्द चार पिकअप वाहनावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
एकुण ०९ जनावर (गौवंश), ४ म्हैस व १ वगाराची सुटका
२ गुन्हयात चार पिकअप वाहनासह एकुण ३७,४०,०००/- रु. चा माल जप्त
चंद्रपुर : दिनांक ३० नोव्हेंबर, २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर च्या पथकाने मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे बल्लारपूर अंतर्गत मौजा मानोरा रोडवर पोलीस स्टॉफ व पंचासह नाकाबंदी करुन तीन पिकअप वाहने थांबवुन पंचासमक्ष तपासणी केली असता सदर वाहनात एकुण ०९ नग जनावर (गौवंश) कोंबुन कत्तलीकरीता नेत असल्याचे मिळुन आल्याने आरोपी नामे (१) राहुल दशरथ नाकाडे वय २७वर्ष (२) अनिल नारायण सहारे वय २५ वर्ष (३) रामेश्वर अरुण करंबे वय ३८ वर्ष तिन्ही रा. ब्रम्हपुरी (४) रणजीत पुंजाराम ढोंगे वय ४३ वर्ष व पाहिले असलेला आरोपी (५) पिंटु सय्यद रा. ब्रम्हपुरी (६) पहेलवान रा. लक्कडकोट यांच्याविरुध्द पोलीस स्टेशन बल्लारपुर येथे ११ (१) (घ) (ड) (च) (ज) भारताचा प्राण्यास कुरपणे वागविण्यास प्रतिबंध अधिनियम, सहकलम ५ (अ), ५ (ब), ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, कलम ४९ भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असुन आरोपीकडुन महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन क्रमांक MH33-T-0452, MH34-BZ-5083, MH34-BG-3956 किं.अं.२७,००,०००/- तसेच सदर वाहनातील एकुण ०९ नग जनावर (गौवंश) किं.अं. २,७०,०००/- असा एकुण २९,७०,०००/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.
तसेच पो.स्टे. रामनगर हद्दीत जुनोना फाटा येथे नाकाबंदी करुन नांदेड मार्गे कत्तलीसाठी जाणा-या पिकअप वाहन थांबवुन पंचासमक्ष तपासणी केली असता सदर वाहनात एकुण ०४ नग म्हैस व १ नग वगार कोंबुन कत्तलीकरीता नेत असल्याचे मिळुन आल्याने आरोपी नामे (१) पांडुरंग विठ्ठल तडेकोट, वय २४ वर्ष (२) तिरुपती तुळशीराम सादगिरे वय २८ वर्ष व (३) अर्जुन लक्ष्मण येडगे तिन्ही रा.नांदेड यांचेविरुध्द पो.स्टे. रामनगर येथे कलम ११ (१) (घ) (ड) (च) (ज) भारताचा प्राण्यास कुरपणे वागविण्यास प्रतिबंध अधिनियम गुन्हा नोंदविण्यात आला असुन सदर गुन्हयात जनावरे किं.अं. १,७०,०००/- रु. आणि वाहन क्र. MH26-CH-3601 किं.अं.६,००,०००/- रु. असा एकुण ७,७०,०००/- रु.चा माल जप्त करण्यात आला आहे.
सदरची दोन्ही कारवाई मुम्मका सुदर्शन-पोलीस अधीक्षक चंद्रपूर, ईश्वर कातकडे-अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सपोनि दिपक कॉक्रेटवार, बलराम झाडोकार, पोउपनि विनोद भुरले, संतोष निंभोरकर, सफौ धनराज करकाडे, पोहवा सुरेंद्र महतो, जयंत चुनारकर, पोअं. प्रदिप मडावी, अजित शेन्डे, सुमित बरडे, प्रफुल्ल गारगाटे, नितेश महात्मे, चापोअं मिलींद टेकाम सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केली आहे.