जेष्ठ नागरिकांच्या मूलभूत समस्या प्राधान्याने सोडवू ; चंद्रपुरातील जेष्ठ नागरिकांशी संवाद…
चंद्रपूर शहरातील पसायदान ग्रुपच्या जेष्ठ नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या विविध समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या. वाढत्या महागाईत पेन्शन, आरोग्य सेवा, औषधोपचार, सार्वजनिक सुविधा, सुरक्षितता व सन्मानजनक जीवनाशी संबंधित प्रश्नांवर जेष्ठ नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या.
या संवादात बोलताना आ. विजय वडेट्टीवार म्हणाले की, “समाजाच्या जडणघडणीत जेष्ठ नागरिकांचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या अनुभवाचा सन्मान राखत त्यांच्या मूलभूत समस्या प्राधान्याने सोडविणे हे आपले कर्तव्य आहे. आरोग्य, निवास, पेन्शन, मोफत व सुलभ वैद्यकीय सेवा यांसह जेष्ठ नागरिकांच्या जीवनाशी निगडीत प्रश्नांवर ठोस उपाययोजना केल्या जातील. जेष्ठ नागरिकांनी शहरातील अपुऱ्या आरोग्य सुविधा, सरकारी रुग्णालयांतील गैरसोयी, सार्वजनिक ठिकाणी बसण्याची व्यवस्था, वृद्धांसाठी स्वतंत्र सेवा केंद्रांची गरज, तसेच वाढत्या विजेच्या दरांचा भार याबाबत चिंता व्यक्त केली. यावर संबंधित विभागांकडे पाठपुरावा करून या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले.
भाजप सरकारच्या काळात सामान्य जनता, विशेषतः जेष्ठ नागरिक दुर्लक्षित झाले आहेत. केवळ घोषणा न करता प्रत्यक्षात सुविधा देणारे प्रशासन आवश्यक आहे. चंद्रपूर शहरात जेष्ठ नागरिकांसाठी सन्मान, सुरक्षा आणि सुविधा मिळतील यासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे.
या कार्यक्रमात अनेक जेष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संवादात्मक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे जेष्ठ नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी पसायदान ग्रुपचे अध्यक्ष प्रकाश गुंडावार, आरोराजी, अशोक बिरेवार, विजय गादेवार, चंद्रभान चिंचाळकर, ताराचंद गजबिये, नामदेवराव वांढरे, हेडाऊजी, अरविंद मुसळे, महादेवराव गौरकर, चिताडेजी व ज्येष्ठ नागरिक संघातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.