प्रतिबंधीत नायलॉन मांजा विक्री करणारे विरुध्द कारवाई
नायलॉन मांजा चे १३७ नग प्लॉस्टीक चक्री किं. अं.२,०४,०००/- रु. चा माल जप्त
स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ची कामगिरी
दिनांक १४ जानेवारी, २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पथकाने बातमीदारांकडुन मिळालेल्या गोपनिय माहिती चे आधारे पो.स्टे. रामनगर हद्दीत नाकाबंदी करुन मोटार सायकलवरुन प्रतिबंधीत नायलॉन मांजा विक्री करीता वाहतुक करीत असतांना मिळु आलेले आरोपी नामे (१) राजेश खुशाल वेरकडे वय ३२ वर्ष रा. बियाणी पेट्रोल पंप जवळ चंद्रपूर (२) सौरभ लहानु वाढई वय २६ वर्ष रा. बिनबा गेट जवळ चंद्रपूर यांचे ताब्यातून पतंग उडविण्याकरीता वापरण्यात येणारा, मानवी जिवितास आणि पर्यावरणास धोकादायक असलेला प्रतिबंधीत नायलॉन मांजा असलेल्या १३७ नग चक्री व वाहतुकीस वापरलेली मोटार सायकल असा एकुण किं. अं. २,०४,०००/- रु.चा माल जप्त केला असुन सदर प्रतिबंधित नायलॉन मांजा हा नामे गौरव गोटेफोटे रा. चंद्रपूर याचे कडुन आणल्याचे सांगितल्याने आरोपीतांविरुध्द पोस्टे रामनगर येथे अपराध क्रमांक ३६/२०२६ कलम २२३, २९२, ४९ भारतीय न्याय संहिता-२०२३ सहकलम ५, १५ पर्यावरण संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.
सदरची कारवाई श्री मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री ईश्वर कातकडे अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पो.नि. श्री अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोउपनि श्री सर्वेश बेलसरे, पोउपनि श्री संतोष निंभोरकर, पोहवा जयसिंग, सचिन गुरनुले, गणेश भोयर, गणेश मोहुर्ले, संतोष येलपुलवार, दिनेश अराडे, नितीन रायपुरे, पोअं सुमीत बरडे, सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली आहे.
नागरीकांना आवाहन करण्यात येते की, जर कोणीही नायलॉन मांजा वापर करतांना किंवा विक्री करतांना आढळून आल्यास त्याबाबतची माहिती तात्काळ चंद्रपूर पोलीस दलाचे WhatsApp No. 7887890100 आणि 112 यावर कळवावे. माहिती देणाऱ्यांचे नांव गोपनिय ठेवण्यात येईल.