नितेश केराम
कोरपना शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांनी नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे काही दिवसापूर्वीच शहरातील एका बिअर बारमध्ये धाडसी चोरी झाली असतानाच काल मध्यरात्री पुन्हा ज्वेलसच्या दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे विशेष मनजे शहरात सीसीटीव्ही कॉमेऱ्यांचा अभाव असल्याने चोरट्याना एकप्रकारे मोकळे रान मिळत असल्याचे चित्र आहे
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार काल मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शहरातील एका नामांकित ज्वेलसचे दुकान लक्ष केले दुकानाच्या मागच्या बाजूची भिंत फोडून आत शिरण्याचा प्रयत्न सुरु असतानाच काही कारनास्तव चोरट्यांचा हा प्रयत्न फसला मात्र या घटनेमुळे व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एरणीवर आला आहे यापूर्वी बिअर बारमध्ये झालेल्या चोरीचा तपास अद्याप पूर्ण झालेला नसतानाच ही दुसरी घटना घडल्याने पोलिसांच्या गस्तीवरही प्रश्न चिन उपस्थित केले जात आहे
व्यापारांची मागणी
वाढत्या चोरीच्या सत्रामुळे कोरपना येतील व्यापारी संघटना आक्रमक झाली आहे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी आणि नगर प्रशासनाने महत्वाच्या ठिकाणी तातडीने सीसीटीव्ही कॉ मेरे बसवावेत अशी मागणी जोर धरत आहे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे