आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे माता रमाई यांना अभिवादन
रमाईने त्यागाचा संदेश दिला: विवेक बोढे
घुग्घुस: येथील आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे ७ फेब्रुवारी रोजी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी भाजपा नगर सेवक विवेक बोढे व प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे यांनी माता रमाई यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले.
मनोगत व्यक्त करतांना भाजपा नगर सेवक विवेक बोढे म्हणाले, भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्थपणे साथ देणाऱ्या “त्यागमूर्ती माता रमाई” यांची जयंती ७ फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात येते.
बाबासाहेबांच्या उच्च शिक्षणासाठी आणि त्यांच्या ध्येयधोरणासाठी रमाईंनी आयुष्यभर कठीण परिस्थितीचा सामना केला. घरची आर्थिक परिस्थिती कमकुवत असतांनाही मुलांना सांभाळले दुःख पचवले पण बाबासाहेबांच्या कार्यात कधीच अडथळा येऊ दिला नाही म्हणूनच त्यांना ‘त्यागमूर्ती’ म्हटले जाते.
मी माता रमाईच्या त्यागाला मानाचा मुजरा करतो. माता रमाईच्या चरणी माझे कोटी कोटी वंदन!