आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे पंडित दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन

6

आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे पंडित दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन



पंडितजींचा अंत्योदयाचा संदेश राष्ट्रनिर्माणासाठी प्रेरणा देणारा: भाजपा नगर सेवक विवेक बोढे


घुग्घुस: येथील आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे ११ फेब्रुवारी रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त विन्रम अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी भाजपाचे नगर सेवक विवेक बोढे यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विन्रम अभिवादन केले.

मनोगत व्यक्त करतांना भाजपाचे नगर सेवक विवेक बोढे म्हणाले, पंडित दीनदयाल उपाध्यायजी एकात्म व मानववादाचे प्रणेते होते. पंडितजी यांचा अंत्योदयाचा मंत्र आत्मनिर्भय भारताचा पाया आहे, जो समाजाच्या अंतिम व्यक्तीच्या सशक्तीकरणावर जोर देतो. एकात्म व मानववादाचा उद्देश व्यक्ती केंद्रित विकास आहे. एकात्म, मानवदर्शन व अंत्योदय हा संदेश राष्ट्रनिर्माणासाठी प्रेरणा देणारा आहे.

यावेळी भाजपाचे अजय लेंडे, गणेश राजूरकर, निखिल आत्राम, सतीश निब्रड, आकाश वेलादी, निशा उरकुडे, प्रीती गुल्हाने, खुशबू मेश्राम, भारती परते, प्रिया नागभीडकर, जाई आत्राम, मयुरी धुर्वे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here