जि प शाळा कोडशी ( खु ) येथे शाळा व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड

3

जि प शाळा कोडशी ( खु ) येथे शाळा व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड



नितेश केराम
कोरपना पंचायत समिती अंतर्गत कोरपना बीटातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोडशी ( खु ) येथे शाळेचे मुख्याद्यापक कैलाश मस्के यांच्या अध्यक्षतेखाली शाळा व्यवस्थापन समिती ची एकमताने निवड करण्यात आली शाळा व्यवस्थापन समिती निवड करताना प्रत्येक वर्गातील विद्याथ्याच्या पालकांना प्रतिनिधित्व देण्यात आले निवड करताना शासन निर्णयातील मार्गदर्शक तत्वानुसार उपेक्षित गट आणि दुर्बल घटकातील पालकांना प्रमाणशीर प्रतिनिधित्व देण्यात आले
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सौ अर्चना वडे तर उपाध्यक्षपदी महेश बोर्ड यांची निवड करण्यात आली सदस्य म्हणून सौ शक्षिकला कांबळे प्रवीण पिदूरकर सौ दिक्षा मेसराम सौ भावना ढोके विजय टोंगे सौ रजनी इटकलवार यांची निवड करण्यात आली शाळा व्यवस्थापन निवडीच्या वेळी शाळेच्या शिक्षिका पुष्पा सोयाम महेश राठोड उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here