निस्तार हक्काचा गाव तलाव माती टाकून बुजवीणाऱ्यावर कारवाई करा
पोलीस निरीक्षकांना नगराध्यक्ष सह सभापतींची कारवाईची मागणी
घुग्घूस :- शहरातील वस्ती भागात गोंडकालीन गाव तळे आहेत.
या गाव तळ्यावर नागरिकांचा निस्तार हक्क व मानवीय हक्क कायदा लागू आहे.
या तळ्याला तळ्याचा मालक बुजवू शकत नाही.
मात्र या तळ्याला माती टाकून बुजविण्याचे कार्य तळे मालका कडून सुरू करण्यात आल्याने गावात प्रचंड असा आक्रोश निर्माण झाला आधीच भिषण अश्या पाणी टंचाईचा सामना करीत असलेल्या शहराला हा तळ बुजविण्यात आल्यास बोरिंगला पाणीच येणार नाही.
गावातील नागरिकांना पाण्याच्या तीव्र संकटाला समोर जावे लागणार आहे तळे मालकांनी नगरपरिषदेची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता तळे बुजविण्यास सुरुवात केल्यामुळे असल्यामुळे संतप्त झालेले नगराध्यक्ष दिप्ती सोनटक्के, उप – नगराध्यक्ष व पाणी पुरवठा सभापती राजुरेड्डी, बांधकाम सभापती रोशन पचारे, स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य सभापती नुरूल सिद्दीकी, नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य सूरज कन्नूर व पदाधिकाऱ्यांनी सदर गंभीर प्रकरणाची तातळीने दखल घेत पोलीस स्टेशन घुग्घूस येथे पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रार केली.
नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष उप – नगराध्यक्ष व सभापतीनी तळ्यात टाकलेली मातीचा उपसा करून सदर तळा जशास तसा करण्याचा निर्धार घेतला असून जेसीबी व ट्रॅक्टरच्या साहायने सदर मातीची उचल करण्यात येणार आहे.