सावलहिरा येथे महिला भारूड भजन स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात संम्पण
नितेश केराम
कोरपना तालुक्यातील सावलहिरा येथे जय जगनाथ बाबा महिला भारूड भजन मंडळ सावलहिरा द्ररा आयोजित महिला भारूड भजन स्पर्धेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दि 16/2/2026 ला साय 8:30 वा सौ अर्चना देवराव भोंगळे यांच्या हस्ते या भजन स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले याच भजन स्पर्धेच्या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण दि 17 फेब्रुवारी 2026 साय 6:30 ला प्रमोद कोडापे ता कोषाध्यक्ष भाजपा तथा जिल्हा महामंत्री भाजपा आदिवासी आघाडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या प्रसंगी सावलहिराचे माजी सरपंच पुंजाराम कोवे ,मनोज तुमराम तालुका अध्यक्ष आदिवासी आघाडी कोरपना, सरपंच उमेश पेंदोर, उपसरपंच प्रशांत जोगी, ग्रा प सदस्य सुनील गेडाम ,पो पाटील सावलहिरा देविदास पाटील ,मालेकार वसंता पा बहिरे दिनकर पा मुसळे ,सुधाकर मालेकार, सुधाकर बहिरे ,विनोद नागोसे, पवन मुसळे ,अतुल मुसळे, राजकुमार मुसळे, जगदीश हंस्कर, अखिल जोगी, अनिल राऊत ,निखिल ताजने, आदी उपस्थित होते प्रथम क्र बक्षीस कन्हाळगाव भजन मंडळाने पटकावीला या कार्यक्रमाचे संचालन उमेशजी पेंदोर यांनी केले तर आभार पवन मुसळे यांनी मानले या स्पर्धेच्या यशस्वितेकरिता सर्व सावलहिरा ग्रामस्थांनी सहकार्य केले








