छत्रपती शिवाजी महाराज हे कष्टकऱ्यांचे राजे होते – कॉ ॲड कुमार मोहरमपुरी
________________________
वणी : “लोकांनी लोकांसाठी लोकांद्वारे चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही! परंतु आज लोकशाही व्यवस्थेमध्ये जगत असतानाही एका राजाची जयंती एवढ्या उत्साहाने साजरी होते यावरून छत्रपती शिवाजी महाराज यांची महानता लक्षात येते. शेतकऱ्यांचा भाजीच्या देठालाही धक्का लागू नये अशी आपल्या सैनिकांना आदेश देणारे शिवाजी महाराज हे खरे रयतेचे ( कष्टकऱ्यांचे ) राजे होते.” असे प्रतिपादन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने घेतलेल्या जयंती कार्यक्रमानिमित्त माकपचे जिल्हा सचिव कॉ ॲड कुमार मोहरमपुरी यांनी आपले विचार व्यक्त करताना केले.
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉ किसन मोहुर्ले व कॉ प्रीती करमणकर यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वतीने वणी येथे घेण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त घेतलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कॉ किसन मोहुर्ले हे होते. यावेळेला प्रमुख वक्ते माकपचे जिल्हा सचिव कॉ ॲड कुमार मोहरमपुरी, तालुका सचिव कॉ गजानन ताकसांडे, आशा स्वयंसेविका सीटू संघटनेचा जिल्हा उपाध्यक्ष कॉ प्रीती करमणकर यांनी आपले विचार मांडले.
कार्यक्रमाला तालुक्यातील अनेक गावातील कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रामुख्याने संजय वालकोंडे, हरिश्चंद्र चिकराम, वसंता नागोसे, शांताबाई उरकुडे, संभाजी टांगे, सुधाकर सोनटक्के, प्रतिभा लांजेवार, अरुण चिंचोलकर, सुभाष नांदेकर, अर्जुन शेडमाके, विठ्ठल शेंडे आदी उपस्थित होते.