वणी तालुक्यातील येनाडी येथे जगन्नाथ बाबा पालखी उत्सव उत्साहात संपन्न

5

वणी तालुक्यातील येनाडी येथे जगन्नाथ बाबा पालखी उत्सव उत्साहात संपन्न



वणी (प्रतिनिधी): वणी तालुक्यातील येनाडी येथे जगन्नाथ बाबा पालखी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हजारो भाविकांनी उपस्थित राहून उत्सवात सहभाग नोंदविला.

उत्सवानिमित्त पहाटे काकड आरती, अभिषेक व पूजाविधी पार पडले. त्यानंतर गावातून पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. महिलांनी फुगड्या खेळत तसेच वारकऱ्यांनी अभंग गात उत्सवात रंग भरला.

पालखी सोहळ्यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. तसेच पारंपरिक ‘काला’ कार्यक्रमही उत्साहात पार पडला.

उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थ, युवक मंडळ तसेच विविध समित्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्याने सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here