प्रदूषण नियंत्रणा करीता घुग्घूस शहरात 100 ठिकाणी डस्ट कलेक्टर लावा : राजुरेड्डी
घुग्घूस : चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध असलेले व प्रदूषणात महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर असलेले घुग्घूस शहरातील हवा आजघडीला अंत्यन्त विषारी व जीवघेणी झालेली आहेत हवेत मोठ्या प्रमाणात धूळ कण येत असून यामुळे डोळ्यात जळजळ व श्वसन रोग, त्वचा रोग, ह्रदयाघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत.
लहान मुलांना तर अंत्यन्त जीवघेणे आजार या प्रदूषणामुळे होत आहे.
प्रदूषण नियंत्रणा करीता शासनाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाची निर्मिती केलेली आहे सदर विभाग सदैव कुंभकर्णी झोपेत असतो किंवा त्यांच्यावर या उद्योगाने इतका आर्थिक वजन ठेवला आहे की ते कार्यलया बाहेर निघतच नाही.
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या हलगर्जीपणामुळे घुग्घूस शहरातील नागरिकांचे स्वास्थ आरोग्य व जीव धोक्यात आलेले शहरातील नागरिकांच्या आरोग्य रक्षणा करीता संपूर्ण घुग्घूस शहरात 100 ठिकाणी डस्ट कलेक्टर लावण्यात यावे याची निरंतर देखरेख करण्यात यावी.
व प्रदूषण नियंत्रण करीता कठोर अंमलबजावणी करण्यात अशी मागणी घुग्घूस नगरपरिषदेचे उप – नगराध्यक्ष तथा पाणी पुरवठा सभापती राजुरेड्डी यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्य अधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे.
शहरातील गंभीर प्रदूषण समस्याकडे तातळीने लक्ष न दिल्यास संपूर्ण नागरिकांना घेऊन प्रदूषण मंडळाच्या कार्यलयात आंदोलनाचा इशारा ही रेड्डी यांनी दिलेला आहे.