मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेचा वतीने दिनांक २५ ला वणी येथे धरणे आंदोल
वनाधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी होणार आंदोलन
_______________________
वणी : यवतमाळ जिल्ह्यात वनात राहणारे आदिवासी व इतर पारंपरिक निवासी भूमिहीन असल्याने ते गेल्या कित्येक वर्षांपासून वन जमीन कसत आहेत. त्यांना जमिनीचा पट्टा मिळावा यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय किसान सभेचा वतीने सातत्याने आंदोलन चालू आहे. परंतु अजूनही अनेकांना जमिनीचे पट्टे न मिळाल्याने दिनांक २५ फेब्रुवारी ला महाराष्ट्र सरकारने लाँग मार्च ला दिलेल्या आश्वासनानुसार दावे दाखल केलेल्या भूमिहीनांना जमिनीचे पट्टे देण्याची प्रक्रिया सुरु करावी यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात वनजमीन कसणाऱ्यांकडून उपविभागीय अधिकारी यांना व्ययक्तिक अर्ज सादर करण्यात येणार आहे.
सन २००४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ६२ खासदार निवडून आल्याने यूपीए सरकारला बाहेरून पाठिंबा देण्यात आले होते. त्यावेळेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने मंत्रिपद न घेता २० सूत्री कार्यक्रम दिले होते. त्यामध्ये रोजगार हमी कायदा, अन्न सुरक्षा कायदा, वनाधिकार कायदा, शिक्षणाचा कायदा असे व अन्य कार्यक्रम होते. त्यातील २००६ ह्या वर्षीचा वनाधिकार कायद्या नुसार वन जमीन कसणाऱ्यांना मालकी हक्काचे पट्टे देण्यात आले पाहिजे होते. परंतु गेल्या २० वर्षात ह्याची प्रभावी अंमलबजावणी ना काँग्रेसचा कार्यकाळात झाली ना भाजप सरकारचा कार्यकाळात झाली. अजूनही महाराष्ट्रात लक्षावधी वन निवासी आदिवासी व गैर आदिवासी पट्टा मिळण्याचा प्रतीक्षेत आहेत. यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेचा वतीने तीन चारदा लाँग मार्च काढून महाराष्ट्र सरकारला बाध्य करण्यात आले तसेच सरकारने लिखित आश्वासन दिले. असे असले तरीही अजूनही प्रशासकीय अधिकारी ह्याकामी कायद्याची अंमलबजावणी करताना दिसत नाहीत. म्हणून लाँग मार्च ला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी म्हणून वयक्तिक अर्ज ह्या आंदोलनाचे माध्यमातून करण्यात येणार आहे.
करिता ह्या आंदोलनात जास्तीत जास्त वन जमीन कसणाऱ्यांनी भाग घेऊन आपला अधिकार मिळवावा असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेचे कॉ.ॲड कुमार मोहरमपुरी, कॉ.ॲड दिलीप परचाके, किसन मोहुर्ले,कवडू चांदेकर, गजानन ताकसांडे, प्रीती करमणकर, बादल कोडापे, संजय वालकोंडे, सुधाकर सोनटक्के,हरिश्चंद्र चिकराम, अरुण चिंचोलकर, शंकर गौतरे, वसंता नागोसे, रामभाऊ जिद्देवार, पुंडलिक ढुमने, श्रीकांत तांबेकर, वंदना नेताजी गेडाम, संभाजी टांगे, शांताबाई उरकुडे, सुभाष नांदेकर, अर्जुन शेडमाके, अमोल चटप आदींनी केली आहे.