Home Breaking News आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे वीर बाबुराव शेडमाके यांना अभिवादन

आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे वीर बाबुराव शेडमाके यांना अभिवादन

11

आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे वीर बाबुराव शेडमाके यांना अभिवादन



इंग्रजांच्या जुलमी राजवटी विरोधात गोंडवानातून वीर बाबुराव शेडमाके यांचा बुलंद आवाज गरजला: किरण बोढे

घुग्घुस: येथील आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे गुरवार, १२ मार्च रोजी वीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त नगर सेवक विवेक बोढे यांच्या मार्गदर्शनाखाली विनम्र अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे यांनी वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.

मनोगत व्यक्त करतांना प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे म्हणाल्या, इंग्रजांच्या जुलमी राजवटी विरोधात गोंडवानातून बुलंद आवाज गरजला होता. वीर बाबुराव शेडमाके यांनी इंग्रजाविरोधात सशस्त्र उठाव केला व त्यांना सळो की पळो करून सोडले. वीर बाबुराव शेडमाके यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केल्याबद्दल त्यांना पकडण्यात आले व फाशी देण्यात आली, वीर बाबुराव शेडमाके देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर गेले.

यावेळी प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे, उमेश दडमल, हेमंत कुमार, प्रणय काटवले, अजय लेंडे, निशा उरकुडे, सुनंदा लिहीतकर, लता आवारी, प्रीती धोटे, स्वाती गंगाधरे, जाई आत्राम, नेहा कुम्मरवार, प्रिया नागभीडकर, भारती परते आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here