- नागाळा महीला तलाठी कर्मचारीवर
ACB चे टीमने लाच घेतानी रंगेहाथ पकडली
चंद्रपूर : जिल्ह्यातील घुग्घुस मार्गावर असलेला गाव नागाळा येथे एका महिला तलाठी कर्मचारीला ACB टीम ने 4 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे.
सदर प्रकरणी तक्रारकर्ता हे शेतकरी असून त्यांनी मौजा सिदूर पिपरी येथील शेती पत्नी व मुलांच्या नावे बक्षिस पत्र करून दिले होते, बक्षीस पत्राच्या आधारे शेतीचे फेरफार करण्याच्या कामाकरिता मौजा नागाळा येथील तलाठी कार्यालयात जात तलाठी श्रीमती प्रणाली अनिलकुमार तुडूंरवार यांच्याकडे अर्ज केला, काही दिवस झाल्यावर अर्जाचे काय झाले याबाबत फिर्यादी हे तलाठी कार्यालयात गेले, त्यांनी तलाठी यांना विचारणा केली असता त्यांनी फेरफार व सातबारा तयार करण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच मागितली.
फिर्यादी यांना पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली, 7 मार्च रोजी तक्रारीची पडताळणी केल्यावर पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील सापळा रचला, त्यावेळी तलाठी प्रणाली तुडूंरवार यांनी तडजोडीअंती 4 हजाराची लाच मागितली.
तलाठी कार्यालय नागाळा येथे प्रणाली तुडूंरवार यांना 4 हजाराची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली.
तलाठी तुडूंरवार यांना शासनाची सेवा करताना अंदाजे 40 हजार रुपये पगार मिळतो तरी त्यांनी शेतकऱ्याला 4 हजाराची लाच मागितली हे विशेष.
सदर सापळा कारवाई पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील, हिवराज नेवारे, रोशन चांदेकर, वैभव गाडगे, अमोल सिडाम, प्रदीप ताडाम, पुष्पा काचोळे यांनी केली.