लोकसभा निवडणुक-२०२४ पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारूसाठा नष्ट स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर व पोलीस स्टेशन भद्रावती ची संयुक्त कार्यवाही

42

लोकसभा निवडणुक-२०२४ पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारूसाठा नष्ट स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर व पोलीस स्टेशन भद्रावती ची संयुक्त कार्यवाही

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा पोलीस दल सक्रिय झाला असून,मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, रिना जनबंधू अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदशीखाली अवैदय दारू निर्मिती वाहतूक व विक्री वर आळा घालण्याकरीत चंद्रपूर पोलीसांनी धडक मोहिम हाती घेतली आहे.आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या तोंडावर जिल्हात मोठ्या प्रमाणत हातभट्टी तसेच अवैद्य मद्य निर्मिती वाहतूक आणि विकी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्याच पार्शवभूमीवर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करण्यात आले असून सदर पथकाचे माध्यमातून मोठ्या प्रमाणात अवैध्यरित्या दारूची वाहतूक करणाऱ्यांचे माहिती काढून त्यावर कारवाई सुरू असून जिल्हयात ठिकठिकाणी तयार होणारी हातभट्टी व परराज्यातून वाहतूक होणारी अवैद्य दारू यावर स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष लक्ष आहे.

आज दि. 17 मार्च 2024 रोजी सकाळचे सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय माहिती मिळाली की, पो.स्टे. भद्रावती अंर्तगत बरांज तांडा एक इसम हातभट्टी लावून अवैद्रद्यरित्या दारू गाळीत आहे. सदर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पो.स्टे. भद्रावती यांचे डि.बी. पथकासह रवाना होवून मौजा बरांज तांडा येथे पोहचून शोध घेतला असता एक महिला आपले घराचें मागे हातभट्टी लावून गूळमिश्रित दारू गाळतांना दिसली. सदर घराची कायदेशिररीत्या झडती घेतली असता घरामध्ये गूळ, दारू व तीन प्लॉस्टीक कॅन मध्ये 15 लीटर गूळापासून बनवलेली शरीरास अपायकारक व नाशकारक द्रव्यमिश्रीत पदार्थापासून तयार केलेली हातभट्टी गूळांबा दारू कि. 750/- रू. घराचे समोर झुडपी जंगलात व घाण पाण्याचे नाल्यात जमीनीत गाडलेल्या खड्ड्यामध्ये 12 निळ्या रंगाच्या प्लॉस्टिक ड्रम मध्ये गूळांबा दारू सडवा कि. 90,000/- रू., 02 मोठे स्टिलचे गुंड, दोन जर्मन घमेले, 02 जर्मन गंज भोक पडलेले, 02 स्टिल चाटू 02 प्लॉस्टिक नळी, जळीत लाकूड असा एकूण 97750/- रू. चा मुद्देमाल मिळून आला. सदरचा मुद्देमाल नष्ट करण्यात आलेला असून गुन्हयातील आरोपी नामे श्रीमती सुनीता राजेंद्र पाटील, वय 35 वर्षे, रा. बरांज तांडा ता. भद्रावती यांचे विरूध्द पो.स्टे. भद्रावती येथे कलम 328 भादवी सहकलम 65 (ई), (फ), (ब), (क) मदाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपीस पुढील तपासकामी पो.स्टे. भद्रावती यांचे ताब्यात देण्यात आले.

सदरची कामगिरी ही पोलीस अधिक्षक चंद्रपूर,अपर पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर व पोनि विपीन इंगळे पोस्टे भद्रावती यांचे नेतृत्वात सपोनी हर्षल ऐकरे, सपोनि मनोज गदादे, पोउपनि विनोद भुरले, पोहवा धनराज करकाडे, स्वामीदास चालेकर, संजय आतकुलवार, सुरेंद्र मोहंतो, गजानन नागरे, अनूप डांगे, नितेश महात्मे, संजय वाढई, दिपक डोंगरे, सतिश बगमारे, पोशि प्रशांत नागोसे, चालक पोहवा दिनेश अराडे सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर तसेच पोहवा गजानन तूपकर, अनूप अष्टूनकर, नापोका जगदिश झाडे, विश्वनाथ चुदरी, पो.शि. योगेश घाटोळे सर्व पो.स्टे. भद्रावती यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here