पोलीस अधीक्षकांनी स्वतः दिली रेती घाटावर धडक.. हायवा, पोकलेन मशीन सह दिड कोटीचा मुद्देमला जप्त

64

पोलीस अधीक्षकांनी स्वतः दिली रेती घाटावर धडक.. हायवा, पोकलेन मशीन सह दिड कोटीचा मुद्देमला जप्त

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर मुमक्का सुदर्शन, यांनी अवैध्य रेती चोरीवर आळा घालण्या करीता धडक मोहिम हाती घेतली आहे.

दि.20/03/2024 रोजी रात्रो दरम्यान मा. पोलीस अधीक्षक साहेब यांना विश्वसनीय सुत्राकडून खात्रीशीर खबर मिळाली की, मौजा अजयपुर गोंडसावरी अंधारी नदीपात्रात ट्रकमध्ये अवैध्यरित्या रेती चोरी सुरू आहे. अशाखबरे वरून पोलीस अधीक्षक  मुम्मका सुदर्शन यांनी स्वतः पथकासह खाजगी वाहनाने अजयपुर गॉडसावरी अंधारी नदी रेती घाटावर जावून पाहणी केली असता रोडवर संशईतरित्या एक बोलेरो पिकअप गाडी क्र. MH34BF 1809 हि दिसून आली गाडीमध्ये मोहम्मद शाहरूख इसराईल शेख वय 36 वर्षे रा.संजय नगर चंद्रपूर मिळून आला. त्यास सोबत घेवून अंधारी नदीचे पात्रात गेले असता रेती भरून असलेले 3 हायवा ट्रक दिसून आले. पोलीसांची चाहूल लागल्याने तिन्ही हायवा ट्रक चालकांनी त्यांचे ताब्यातील हायवा ट्रक मधील रेती नदी पात्रात रिकामी केली. हायवा ट्रक क्र. 1) MH34BG5852 2) MH34BG0585 3) MH34BG5861 4) रेतीचे उत्खनन करीता वापरलेले एक KOBELCO कंपनी ची पोकलैंड मशिन मिळून आली मशीन चालक नामे आकाश गावंडे रा. गोडसावरी हा अंधाराचा फायदा घेवून पळून गेला.

नमुद तिन्ही हायवा, बोलेरोगाडी, पोकलैन्ड मशीन चे चालकाने अंधारी नदी पात्रातून रेती गौण खनिजाचे उत्खनन करून 1) नमुद 3 हायट्रकमध्ये प्रत्येकी 8 ब्रास अ.कि.5000/-रू. असा एकूण 24 ब्रॉस 1,20,000/-रू.ची रेती चोरी करून 2) तिन हायया ट्रक प्रत्येक हायवा 25,00,000/-रू. असे 75,00,000/-रु. 3) बोलेरो पिकअप अ.कि. 5,00,000/-रू. 4) पोकलैंड मशीन अ.कि. 70,00,000/-रू. असा एकूण 1,51,20,000/- रू.चा माल जप्त करण्यात आला.

नमुद प्रगाणे रेती व रेती चोरी करीता वापरलेले वाहने पंचासमक्ष जप्त करून आरोपी नामे 1) बोलेरो चालक नामे मोहम्मद शाहरूख इसराईल शेख वय 36 वर्षे रा.संजय नगर चंद्रपूर 2) हायवा चालक नामे श्रावणकुम्प्रर लालुप्रसाद पाल वय 28वर्षे रा.छोटा शिवमंदीर वार्ड, चंद्रपूर ३) हाथवा चालक नामे सुनिल लक्ष्मण जांगडे वय 39वर्षे रा.मातानगर वार्ड, चंद्रपूर 4) हायवा चालक नामे सफन सहादेव समाजपती वय 54 वर्षे रा. अष्टभुजा वार्ड, चंद्रपूर 5) पोकलैंड मशीन चालक नागे आकाश गावंडे रा. गोंडसावरी ता.मुल जि. चंद्रपूर यांचे विरूद्ध पो.स्टे. मुल जि. चंद्रपूर येथे अप.क्र. 118/2024 कलम 379, 34 भा.द.वी. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पो.स्टे. मुल पोलीस करीत आहे.

सदरची बातमी आपल्या लोकप्रीय चैनल तथा वृत्तपत्रांमध्ये प्रकाशीत करण्यास सादर आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here