*पोलीस स्टेशन, रामनगर तसेच स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची संयुक्त कार्यवाही*
- चंद्रपुर: कदिनांक १८/०३/२०२४ रोजी फिर्यादी नामे खुशाल भागचंद अडवानी वय ३८ वर्ष व्यवसाय – व्यापार रा. सिंदी कॉलनी रामनगर चंद्रपुर यांनी पोलीस स्टेशन, रामनगर येथे तक्रार दिली की, दिनांक १५/०३/२०२४ रोजी दुपारी ०१:३० वाजता दरम्यान यातील फिर्यादी हा त्याचे परिवारासह विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथे नातेवाईकाचे घरी कार्यक्रमाकरीता घराचे समोरील दरवाज्याला लॉक करून गेले. नातेवाईकाच्या घरचा कार्यक्रम पुर्ण करून दिनांक १८/०३/२०२४ रोजी सकाळी ०८:०० वाजता घरी परत आले. यातील फिर्यादी हा त्यांचे बॅग हे वडीलाचे बेडरूमध्ये ठेवण्याकरीता गेला असता, वडीलाचे बेड रूममधील खिडकीचे ग्रिल तुटलेले दिसले. तेव्हा बेड रूमधील आलमारीची पाहणी केली असता, आलमारी मधील रोख रक्कम २६,००,०००/- रूपये (सव्वीस लाख रूपये) चोरी झाल्याचे दिसुन आले अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन, रामनगर येथे अप.क्र. ३००/२०२४ कलम ४५४, ४५७, ३८० भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
नमुद गुन्हयाची घरफोडी ही मोठ्या रक्कमेची व अतिशय गंभीर स्वरूपी असल्याने मा. पोलीस अधिक्षक सा. यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर तसेच गुन्हे शोध पथक, रामनगर येथील अधिकारी व कर्मचारी हे घटनास्थळी रवाना होवुन घटनास्थळाचे आजु-बाजुच्या परिसरातील सी.सी.टि.व्हि. फुटेज चेक करून गोपनिय बातमिदाराचे माहीती वरून अतिशय परिश्रम घेवुन तांत्रिक पध्दतीने कौशल्यापुर्ण तपास करून फिर्यादीचे घरी चौकीदार म्हणुन काम करणारा नामे विकास महादेव गोंधळी, रा. तोहगांव, ता. गोंडपिपरी, चंद्रपुर, ह.मु. भागचंद अडवाणी यांचे घरी सिंधी कॉलनी चंद्रपुर यास ताब्यात घेवुन त्यास विश्वासत घेवुन विचारपुस केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली. त्यावरून नमुद आरोपी कडुन गुन्हयात चोरीस गेलेले रोख रक्कम २६,००,०००/- रू, व गुन्हयात वापरलेले साहीत्य जप्त करण्यात आला आहे
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन सा. चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, उपविभागिय पोलीस अधिकारी, सुधाकर यादव सा.यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. सुनिल गाडे, पोलीस स्टेशन, रामनगर, पो. नि. महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर सपोनि हर्षल ओकरे, पोउपनि विनोद भुरले, स्थागुशा, चंद्रपुर तसेच गुन्हे शोध पथक, रामनगर सपोनि देवाजी नरोटे, पोउपनि मधुकर सामलवार, पोउपनि दिपेश ठाकरे, पोहवा/०९ पेतरस सिडाम, पोहवा /११७६ किशोर वैरागडे, पोहवा /२२९६ रजनिकांत पुठ्ठावार, पोहवा / २२७३ शरद कुडे, पोहवा/५३२ सतिश अवथरे, पोहवा /११६५ आनंद खरात, पोहवा/२४५४ प्रशांत शेंदरे, नापोशि/२४३० लालु यादव, पोशि/८२५ हिरालाल गुप्ता, पोशि/८४७ रविकुमार ठेगळे, पोशि/८८७ प्रफुल गारघाटे, पोशि/८८१ संदिप कामडी, पोशि/२५१३ विकास जुमनाके, पोशि/६९९ विकास जाधव, पोशि/१२३० पंकज ठोंबरे, मपोहवा/४६२ मनिषा मोरे पोलीस स्टेशन, रामनगर यांनी संयुक्त पणे कार्यवाही केलेली आहे.